छत्रपती संभाजीनगरात भाजपची मुसंडी

सत्तेसाठी शिवसेनेचा अथवा इतरांचा घ्यावा लागणार आधार


छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने २९ प्रभागांतील ११५ पैकी तब्बल ५६ जागावर विजय मिळवित संभाजीनगरमध्ये आम्हीच मोठे भाऊ आहोत, हे शिवसेनेला दाखवून दिले आहे. तर एमआयएम ३३ जागांवर मिळवून महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून शिवसेना तब्बल तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. त्यांना केवळ १४ जागांवर विजय मिळविता आला.


महापालिकेच्या निवडणूकीत जागा वाटपावरुन शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजपची युती तुटली. शिंदेसेनेने मोठा भाऊ आम्हीच आहोत. त्यामुळे जास्त जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजे, असा दावा केला होता. तर त्यास नकार देत शहरात आमची ताकद वाढली असून जास्त जागा आम्हालाच मिळाव्यात, असे दावा केला होता.


भाजप-शिवसेनेत जागा वाटपावरुन सुरू असलेली रस्सीखेच मुंबईपर्यंत गेली होती. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुनही स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही. यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला जास्त जागा देत कमी जाग घेण्याची तयारी दर्शविली होती. पंरतु, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी विरोध दर्शविला होता. त्यात जंजाळ यांच्यासह सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे रात्रीतून निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी पालकमंत्री शिरसाट यांनी युती तुटल्याचे जाहीर केले. युती तुटल्यानेच अनेक जागांवर मतविभाजपनाचा लाभ एमआयएमला मिळला. यात गुलमंडीतील दोन जागा केवळ मत विभाजनामुळेच भाजप-शिवसेनेला गमवाव्या लागल्या आहेत.


सेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व


छत्रपती संभाजीनगर शहर शिवसेनाचा बालेकिल्ला समजाला जात होता. महापालिकेच्या पहिल्या निवडणूकीपासून (१९८८ सालापासून ) महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. तर या पहिल्या निवडणुकीत भाजपला खातेही खोलता आले नव्हते. परंतु, ३८ वर्षानंतर भाजप ५६ जागा मिळवित पहिल्या क्रमांकावर गेली आहे. तर शिवसेना २९ जागांवरुन थेट १२ वर आले आहे. त्यामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपने वर्चस्व मिळविले असेच चित्र निवडणुकीच्या निकालातून पुढे आले आहे.


एमआयएम २४ वरुन ३३


एमआयएमने २०१४ साली विधानसभा निवडणुकीतून शहरात प्रवेश केला. त्यानंतर २०१५ साली पहिली महापालिका निवडणूक लढविली. त्यात २४ नगरसेवक विजयी झाले होते. तर एक समर्थक नगरसेवकाचा समावेश होता. तो दहा वर्षानंतर ३३ वर गेला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या