मोहित सोमण: प्राथमिक उत्पादन खर्चात वाढ झाल्याने यंदा घाऊक ग्राहक किंमती निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ०.८६% वाढ झाली आहे. प्रोविजनल (तात्पुरत्या) आकडेवारीनुसार, गेल्या डिसेंबरमध्ये (२०२४-२५) असलेल्या तुलनेत संपलेल्या डिसेंबर (२०२५-२६) मध्ये ०.८३% वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये महागाईचा दर सकारात्मक असण्याचे मुख्य कारण इतर उत्पादन, खनिजे, यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन, अन्न उत्पादने आणि वस्त्रोद्योगाच्या किमतींमध्ये झालेली वाढ हे आहे असे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने आकडेवारी देताना नमूद केले आहे. महिन्याच्या आधारे नोव्हेंबर तुलनेत डिसेंबर महिन्यात ०.७१% वाढ झाली.
उपलब्ध माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील चलनात घट झाल्यामुळे घाऊक किमतींमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली होती. ती मंद गतीने झाली कारण ऑक्टोबरमध्ये जुलै २०२३ नंतरची सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली होती. ही मंद गतीची घट प्रामुख्याने अन्नपदार्थांच्या किमतींमधील माफक घसरणीमुळे झाली होती. माहितीनुसार, प्रामुख्याने डिसेंबर २०२५ मध्ये अन्नपदार्थांच्या किमतीत किंचित वाढल्या असून ज्यामुळे महागाईचा दर नोव्हेंबरमधील -२.६०% टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये ०% वाढला होता.
यंदा डिसेंबर महिन्यात तेल बिया आणि खनिजांमध्ये महागाईत अनुक्रमे १४.८२% आणि ११.८६% वाढ झाली आहे. त्यानंतर दूध, अंडी, मांस, मासे आणि फळांच्या किमतीतही डिसेंबरमध्ये वाढ झाली. तसेच भाजीपाला (-३.५०%), कडधान्ये (-१३.८८%) आणि गहू (-१.५८%) यांच्या किमतीत घट झाली. कांदा आणि बटाट्याच्या किमतीत सर्वाधिक चलनघट दिसून आली, ज्यात अनुक्रमे ५४.४०% आणि ३८.२१% घट झाली. दरम्यान, ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे (Consumer Price Index CPI) मोजली जाणारी किरकोळ महागाई नोव्हेंबरमधील ०.७१% वरून डिसेंबर २०२५ मध्ये १.६६% पर्यंत वाढली. ही महागाई वाढ प्रामुख्याने वैयक्तिक काळजी (Personal Care) उत्पादने, मांस आणि मासे, अंडी, मसाले, साखर आणि मिठाई यांसारख्या वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे झाली. यासह डिसेंबरमध्ये इंधन आणि विजेच्या किमतीही वाढल्या. कोळसा आणि खनिज तेलाच्या किमतीतील वाढीसह, विजेच्या वाढलेल्या किमती हे या वाढीचे मुख्य कारण होते.
दरम्यान, डिसेंबरमध्ये उत्पादित वस्तूंच्या किमतीत किरकोळ वाढ झाली. २२ उत्पादनातील धातू, रसायने, वस्त्रोद्योग आणि इतर उत्पादित वस्तूंसारख्या १३ गटांमध्ये किमती वाढल्या आहेत असे सरकारी आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे.