विरार :- वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण ११५ जागांपैकी ७१ जागांवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून, भाजपाने ४३ जागा, तर शिवसेना (शिंदे गट) १ जागेवर समाधान मानावे लागले. उर्वरित पक्षांना एकही जागा मिळालेली नाही.
या विजयासह वसई–विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड यशस्वीपणे राखत पुन्हा एकदा पक्षाची ताकद सिद्ध केली आहे. अनेक प्रभागांमध्ये चारच्या पॅनलने विजय मिळवत बविआने वर्चस्व प्रस्थापित केले.
बहुजन विकास आघाडी विजयी प्रभाग :-
प्रभाग क्रमांक १, ३, ४, ६-०१, ७, ८, ९, १२, १३,१४, १९, २०, २१-०३, २४, २५, २६, २७, २८, २९ (चारचे पॅनल विजयी) — एकूण ७१ उमेदवार.
भाजपा विजयी प्रभाग :-
प्रभाग क्रमांक - २, ५, ६-०३, १०, ११, १५, १६, १७, १८, २१-०१, २२, २३ (चारचे पॅनल विजयी).
या निकालामुळे वसई–विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात महापालिकेच्या कारभारावर बविआचा ठसा अधिक ठळकपणे दिसणार आहे.