मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे मुंबईवर 'महायुती'चे वर्चस्व अधिक गडद होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एकत्रितपणे १०६ जागांवर आघाडी घेत शतकी टप्पा ओलांडला आहे. आता मुंबईच्या सत्तेसाठी आवश्यक असलेला ११४ चा आकडा (मॅजिक फिगर) गाठण्यासाठी महायुतीला केवळ ६ जागांची गरज आहे.
हाती आलेल्या ताज्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने मुंबईत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. ८५ जागांवर आघाडी घेत भाजपने मुंबईतील सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही २१ जागांवर आघाडी मिळवत महायुतीची पकड मजबूत केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची रणनीती यशस्वी ठरल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
ठाकरे बंधूंची युती पिछाडीवर
मुंबईच्या सत्तेसाठी २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला मुंबईकरांनी अपेक्षित प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या युतीला केवळ ६७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामध्ये ठाकरे गट ५८ तर मनसे ९ जागांवर आघाडीवर आहे. मराठी मतांच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या बंधूंना महायुतीच्या 'विकास' आणि 'डबल इंजिन' सरकारच्या अजेंड्याने रोखल्याचे चित्र आहे.
वॉर्ड २ – तेजस्वी घोसाळकर (भाजप) वॉर्ड १९ – प्रकाश तवडे (भाजप) वॉर्ड २० – दीपक तवडे (भाजप) वॉर्ड 36 – सिद्धार्थ शर्मा (भाजप) वॉर्ड ५० – विक्रम राजपूत ...
विजयी आकडेवारीचा वेगवान कल
भाजप : ८५ (आघाडी)
शिवसेना (शिंदे गट) : २१ (आघाडी)
शिवसेना (ठाकरे गट) : ५८ (आघाडी)
मनसे: ०९ (आघाडी)
महायुती एकूण : १०६
मुंबई महापालिकेत गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या सत्तेला यंदा सुरुंग लागण्याची शक्यता आहे. महायुतीच्या या घोडदौडीमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुंबईच्या गल्लीबोळात गुलालाची उधळण सुरू झाली आहे. "हा विजय मुंबईच्या विकासाचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे," अशा प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांकडून उमटत आहेत.
मुंबईतील विजयी उमेदवार
वॉर्ड २ – तेजस्वी घोसाळकर (भाजप)
वॉर्ड १९ – प्रकाश तवडे (भाजप)
वॉर्ड २० – दीपक तवडे (भाजप)
वॉर्ड 36 – सिद्धार्थ शर्मा (भाजप)
वॉर्ड ५० – विक्रम राजपूत (भाजप)
वॉर्ड ५१ – वर्षा तेंबेलकर (शिवसेना)
वॉर्ड ८४ – कृष्णा पारकर (भाजप)
वॉर्ड १०३ – हेतल गाला (भाजप)
वॉर्ड १०७ – नील किरीट सोमय्या (भाजप)
वॉर्ड १३५ – नवनाथ बाण (भाजप)
वॉर्ड १५६ – अश्विनी माटेकर (शिवसेना)
वॉर्ड १५७ – आशा तावडे (भाजप)
वॉर्ड १६३ – शैला लांडे (शिवसेना)
वॉर्ड २०१ – इरम सिद्दीकी (इतर)
वॉर्ड २०४ – अनिल कोकीळ (शिवसेना)
वॉर्ड २०७ – रोहिदास लोखंडे (भाजप)
वॉर्ड २१४ – अजय पाटील (भाजप)
वॉर्ड २१५ – संतोष ढोले (भाजप)
वॉर्ड २०९ - यामिनी जाधव (शिवसेना)