मुंबई : "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम लोकसंख्या ३० टक्क्यांवर जाईल", असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडे केला होता. तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे राज्यभरात तब्बल ९५ नगरसेवक निवडून आल्याने या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.
मुंबईत ४ जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. मानखुर्द-गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. मुंबईतील मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात औवेसी यांची जादू चालल्याचे दिसून येते. सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये एमआयएमचे प्रत्येकी ८ असे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. अमरावती महापालिकेत ६, ठाण्यात ५, नागपूरात ४ ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत.
......
छत्रपती संभाजी नगरमध्ये संख्या सर्वाधिक
राज्यातील २९ पैकी १३ महापालिकांमध्ये एमआयएमचे ९५ नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत त्यांचे सर्वाधिक २४ नगरसेवक निवडून आले. तर, मालेगाव महापालिकेत २० नगरसेवक निवडून आले आहेत.