प्रतिनिधी: कायम अमेरिका फर्स्ट अशी आवई देणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या बेकायदेशीर परदेशी नागरिकांविरोधातील मोर्चेबांधणीचा भाग म्हणून स्थलांतरिविरोधात कारवाईत वाढ केली आहे. कारवाईत वाढ करत आता अमेरिकेने बुधवारी ७५ देशांतील लोकांसाठी स्थलांतरित व्हिसा प्रक्रियेला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय २१ जानेवारीपासून लागू होणार असून तो नियम अमेरिकेत कायमस्वरूपी राहू आणि काम करू इच्छिणाऱ्या लोकांना लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. तशी बातमी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाने आज दिली असून युएस परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार, ज्या देशांवर बंदीचा परिणाम झालेला नाही अशा देशाचा पासपोर्ट असलेल्या दुहेरी नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट म्हणाले आहेत की,'अमेरिकन लोकांकडून संपत्ती लुटणाऱ्यांकडून अमेरिकेच्या स्थलांतर प्रणालीचा होणारा गैरवापर थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या स्थगितीमुळे प्रभावित झालेले ७५ देशांची यादी -
अफगाणिस्तान
अल्बेनिया
अल्जेरिया
अँटिग्वा आणि बार्बुडा
आर्मेनिया
अझरबैजान
बहामास
बांगलादेश
बार्बाडोस
बेलारूस
बेलीझ
भूतान
बोस्निया आणि हर्झेगोविना
ब्राझील
कंबोडिया
कॅमेरून
केप व्हर्डे
कोलंबिया
काँगो
क्युबा
डॉमिनिका
इजिप्त
एरिट्रिया
इथिओपिया
फिजी
गांबिया
जॉर्जिया
घाना
ग्रेनेडा
ग्वाटेमाला
गिनी
हैती
इराण
इराक
आयव्हरी कोस्ट
जमैका
जॉर्डन
कझाकस्तान
कोसोवो
कुवेत
किर्गिस्तान
लाओस
लेबनॉन
लायबेरिया
लिबिया
मोल्दोव्हा
मंगोलिया
माँटेनेग्रो
मोरोक्को
म्यानमार
नेपाळ
निकाराग्वा
नायजेरिया
उत्तर मॅसेडोनिया
पाकिस्तान
काँगोचे प्रजासत्ताक
रशिया
रवांडा
सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट लुसिया
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
सेनेगल
सिएरा लिओन
सोमालिया
दक्षिण सुदान
सुदान
सीरिया
टांझानिया
थायलंड
टोगो
ट्युनिशिया
युगांडा
उरुग्वे
उझबेकिस्तान
येमेन