पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११० मीटर लांबीच्या (१५०० मेट्रिक टन) ओपन वेब गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेकडून पनवेल–कळंबोली दरम्यान अप व डाऊन मुख्य मार्गांवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घोषित झाले आहेत.
या ब्लॉकमुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहेत.
त्यानुसार १८/१९ जानेवारी (रविवार/सोमवार मध्यरात्री) कळंबोली–पनवेल दरम्यान ०१.२० ते ०३.२० वाजेपर्यंत २ तासाचा ब्लॉक असेल.
२५/२६.०१.२०२६ (रविवार/सोमवार मध्यरात्री) कळंबोली–पनवेल दरम्यान ०१.२० ते ०५.२० वाजेपर्यंत ४ तासाचा ब्लॉक असेल.
०३/०४.०२.२०२६ (मंगळवार/बुधवार मध्यरात्र) कळंबोली–पनवेल दरम्यान ०१.२० ते ०४.२० वाजेपर्यंत ३ तासचा ब्लॉक असेल.
१०/११.०२.२०२६ (मंगळवार/बुधवार मध्यरात्र) कळंबोली–पनवेल दरम्यान ०१.२० ते ०३.२० वाजेपर्यंत २ तासाचा ब्लॉक असेल.
१२/१३.०२.२०२६ (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री) कळंबोली–पनवेल दरम्यान ०२.०० ते ०४.०० वाजेपर्यंत २ तासाचा ब्लॉक असेल.
१४/१५.०२.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्र) कळंबोली–पनवेल दरम्यान ०२.०० ते ०४.०० वाजेपर्यंत २ तासाचा ब्लॉक असेल.
सदर ब्लॉक दरम्यान विशेष गाड्या तसेच उशिराने धावणाऱ्या गाड्यांचेही गरजेनुसार रेग्युलेशन करण्यात येईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.