नेमकी घटना काय?
नेल्लोर जिल्ह्यातून जात असताना मालगाडीच्या डब्यांचा ताबा सुटला आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. अपघाताचा आवाज होताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ताडीने धोक्याचा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने, ही मालगाडी असल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला दिमाखात ...
डबे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले आहे. सध्या गॅस कटर आणि क्रेनच्या साहाय्याने घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या काही प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची किंवा काही गाड्या थांबवून ठेवण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृतरीत्या गाड्यांच्या रद्दबातल प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रेल्वे अपघातांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, २ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील निलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा मोठा अपघात थोडक्यात टळला होता. त्यावेळी रेल्वेला गुरे धडकल्याने इंजिनचा पुढचा भाग खराब झाला होता. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नव्हती. मात्र, नेल्लोरमधील आजच्या घटनेने रेल्वेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.