Maharashtra Election 2026 Voting : आज दारू मिळणार? बँका सुरु आहेत का? आज काय काय सुरु आहे? वाचा संपूर्ण यादी

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला दिमाखात सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आज लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून, पहाटेपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. थंडीचा कडाका असूनही ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिलांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्याच्या अनेक भागांत आज सकाळी गारवा होता, तरीही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबईतील विविध केंद्रांवर सकाळी ८ वाजेपूर्वीच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त आणि मतदारांसाठी आवश्यक सुविधा पुरवल्या आहेत. आजचे हे मतदान सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. २९ महापालिकांच्या या महामुकाबल्यात कोण बाजी मारणार आणि कोणत्या पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकणार, याचे चित्र उद्या १६ जानेवारी रोजी स्पष्ट होईल. उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत राज्याचा 'कौल' कोणाच्या बाजूने आहे, हे समजेल. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून आपला हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्याच्या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.


दरम्यान आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर , महाराष्ट्र सरकारने आज ज्या ठिकाणी नगरपालिका निवडणुका होत आहेत त्या सर्व ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या आदेशात मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईसह 29 महानगरपालिका समाविष्ट आहेत. मतदान सुरळीत पार पडावे आणि मतदारांचा सहभाग वाढून पर्यायी मतदानाचा टक्का वाढावा हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे आज कपठे काय बंद असेल आणि कोत्या सुविधा सुरू असतील असा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.



काय काय बंद राहणार ?



  •  कार्यालये आणि संस्था बंद

  • सरकारी आणि निमसरकारी कार्यालये

  • महामंडळे आणि मंडळे

  • सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम

  • बँका

  • बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात स्थित केंद्र सरकारची कार्यालये

  • अनेक खाजगी कार्यालये देखील बंद राहू शकतात ( हे त्यांच्या वैयक्तिक संघटनात्मक धोरणांवर अवलंबून असेल.)

  • सरकारी आणि महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

  • मुंबई येथे मुख्यालय असलेले BSE आणि NSE १५ जानेवारी रोजी म्हणजेच आज संपूर्ण सुट्टी पाळतील. इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि कमोडिटीजमध्ये (सकाळच्या सत्रात) कोणतेही व्यवहार होणार नाहीत.


अत्यावश्यक सेवा आणि वाहतूक



  • रुग्णालये, रुग्णवाहिका, पोलिस आणि अग्निशमन विभाग पूर्णपणे कार्यरत असतील.

  • लोकल ट्रेन आणि बेस्ट बस नेहमीप्रमाणे धावतील, ज्यामुळे मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या मतदान केंद्रांवर पोहोचता येईल.

  • दारू बंदी

  • सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाने १३ ते १६ जानेवारी असे चार दिवस ‘ड्राय डे’ जाहीर केले आहेत.

  • त्यामुळे राज्यात या २९ महानगरपालिका क्षेत्रात दारू विक्री आणि सेवनावर पूर्ण बंदी असेल.

  • या काळात दारूची दुकाने, बार आणि परमिट रूम बंद राहतील.


मतदारांसाठी विशेष व्यवस्था



  • ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांसह एकल पालकांसाठी प्राधान्य मतदान व्यवस्था.

  • सर्व बूथवर पिण्याचे पाणी, वीज, शौचालये आणि रॅम्प यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असतील.


२०१७ नंतर बीएमसी निवडणुका


आज सकाळी ७.३० वाजता महाराष्ट्रातील ९ महानगरपालिकांमध्ये मतदान सुरु झालं. २९ महानगरपालिकांमधील २ हजार ८६९ जागांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राज्यातील ३ कोटी ४९ लाख मतदार त्यांचे भवितव्य ठरवतील. तसेच बीएमसीच्या निवडणुकांसाठीही २०१७ नंतर आज मतदान होत आहे. यावेळीच्या बीएमसी निवडणुका खूपच रंजक आहेत, कारण फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना ( शिदे गट- ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट – शरद पवार गट) बीएमसी निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले असून निवडणूक लढवत आहेत. बीएमसी निवडणुकीत मराठी अस्मिता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा