मोहित सोमण: इन्फोसिस कंपनीने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ६८०६ कोटी तुलनेत २% घसरण झाल्याने नफा ६६५४ कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या महसूलात (Revenues) इयर ऑन इयर बेसिसवर ८.९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील ४१७६४ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४५४७९ कोटीवर वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात इयर ऑन इयर बेसिसवर ३.१% वाढ झाल्याने खर्च ३७३२ कोटीवरुन ४४७२ कोटींवर वाढला आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यातही इयर ऑन इयर बेसिसवर ६.३% घसरण झाल्याने नफा ८९१२ कोटीवरून ८३५५ कोटींवर घसरला आहे.एक्सचेंजमधील माहितीनुसार, बेसिक ईपीएस (Earning per share EPS) इयर ऑन इयर बेसिसवर ०.५७ रूपयावरून ०.५८ रूपयावर किरकोळ वाढ झाली आहे.
याविषयी प्रतिक्रिया देताना,'इन्फोसिसने तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे इन्फोसिस टोपाझद्वारे एंटरप्राइझ एआयमधील आमचे वेगळे मूल्य प्रस्ताव सातत्याने बाजारातील मोठा वाटा मिळवून देत आहेत हे दिसून येते. ग्राहक इन्फोसिसला त्यांच्या एआय भागीदार म्हणून पाहत आहेत, ज्यांच्याकडे सिद्ध कौशल्य, नाविन्यपूर्ण क्षमता आणि मजबूत वितरण क्षमता आहेत. यामुळे त्यांना व्यवसायाची क्षमता अनलॉक करण्यास आणि मूल्य प्राप्ती वाढविण्यात मदत झाली आहे,'असे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले आहेत. 'या प्रवासाच्या केंद्रस्थानी, एआय समर्थित जगात यश मिळवण्यासाठी आमच्या समर्पित मनुष्यबळाला पुन्हा प्रशिक्षित करणे, रूपांतरित करणे आणि सक्षम करणे ही आमची वचनबद्धता आहे' असेही ते पुढे म्हणाले.
याविषयी प्रतिक्रिया देताना,'तिसऱ्या तिमाहीत आमची कामगिरी सर्वसमावेशक होती, ज्यात महसुलात ०.६% क्रमवार वाढ, समायोजित (Adjusted) ऑपरेटिंग मार्जिनमध्ये ०.२% वाढ, ४.८ अब्ज डॉलर्सचे मोठे करार जिंकणे आणि हंगामीदृष्ट्या कमकुवत तिमाहीत ९६५ दशलक्ष डॉलर्सची मजबूत समायोजित रोख निर्मिती यांचा समावेश आहे' असे सीएफओ जयेश संघराजका म्हणाले. पुढे म्हणाले आहेत की,'आमच्या भांडवल वाटप धोरणानुसार,आम्ही १८००० कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बायबॅक यशस्वीरित्या पूर्ण केला आणि भागधारकांना अंतरिम लाभांश दिला'.
इन्फोसिस देशातील क्रमांक दोनची आयटी कंपनी असून कंपनीचे जगभरात कर्मचारी आहेत. इन्फोसिस लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान आयटी कंपनी डिजिटल सेवा आणि सल्लागार क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी आहे. कंपनीचे मुख्यालय कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे आहे. आज कंपनीचा शेअर ०.६२% उसळत १६०८.९० पातळीवर बंद झाला आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये १.१८% घसरण झाली असून गेल्या महिनाभरात शेअर्समध्ये ०.१३% वाढ झाली आहे तर वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १७.०७% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ०.८८%% घसरण झाली आहे.