मुंबईतील ८५ लाख मतदारांना झाले मतदार ओळखपत्रांचे वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक यांसह आवश्यक माहिती असलेली मतदार माहिती चिठ्ठी सुमारे ८५ लाख मतदारांपर्यंत वितरित करण्‍यात आली आहे. मुंबईतील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत निर्धारित कालावधीत मतदार माहिती चिठ्ठी वेळेत व अचूकरित्‍या पोहोचविण्‍याची कामगिरी घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाने केली आहे. दरम्‍यान, मुंबईकर मतदारांनी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.


राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार मतदारांना आपले मतदान केंद्र, मतदार यादीतील क्रमांक आदी माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मतदार माहिती चिठ्ठ्या दिल्या जातात. मतदारांपर्यंत ह्या चिठ्ठ्या त्या त्या प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी - कर्मचारी यांच्यामार्फत वितरित करण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) किरण दिघावकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली मतदार चिठ्ठया वितरणाची कार्यवाही सुरू आहे.


उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) किरण दिघावकर म्‍हणाले की, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व सोयीस्कर व्हावी, या उद्देशाने मतदानापूर्वी काही दिवस अगोदर मतदारांची नावे, त्यांचा अनुक्रमांक, प्रभाग क्रमांक, प्रभागाचे नाव आदी तपशील असलेली मतदार चिठ्ठी वितरित करण्यात येते. मतदारांना मतदान करणे सोपे व्हावे तसेच एकूण मतदानाची टक्केवारी वाढावी, या दृष्टीने हा वैधानिक उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहायक अभियंता, अवेक्षक यांच्या समन्वयाने मतदार माहिती चिठ्ठी घरोघरी पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या कामकाजासाठी एकूण मिळून ६ हजार ७०१ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्‍यात ५ हजार १३८ कर्मचारी, ९४५ स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, १०० आशा कार्यकर्त्या आणि ५१८ बूथ स्तर अधिकारी यांचा समावेश आहे. आजपर्यंत सुमारे ८५ लाख मतदार ओळखपत्र चिठ्ठयांचे वितरण झाले आहे. उर्वरित १५ लाख मतदार ओळखपत्र चिठ्ठया मतदान केंद्रावर मतदारांना उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍याचे दिघावकर यांनी सांगितले.


याशिवाय, निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि स्वच्छतेची खात्री करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व १० हजार २३१ मतदान केंद्रांवर निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाने मतदार आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी विविध मतदान केंद्रांवर ४ हजारांहून अधिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. त्‍यात पोर्टेबल आणि मोबाइल युनिट्सचा समावेश आहे. याखेरिज १४ जानेवारी आणि १५ जानेवारी २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर अतिरिक्त स्‍वच्‍छता कर्मचारी तैनात करण्‍यात आले आहेत. असेदेखील दिघावकर यांनी नमूद केले आहे.

Comments
Add Comment

मतदानाला जाताना ओळखीच्या पुराव्यांपैंकी एक पुरावा बाळगा जवळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर

मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?

मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या

मुंबईत मतदान केंद्रासह परिसरही राखणार स्वच्छ

पुढील तीन दिवसांमध्ये राखली जाणार स्वच्छता मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?

मुंबई : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५

मकरसंक्रांतीचे महत्त्व सांगणारे मुलांसाठीचे भाषण

मुंबई : 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा प्रेमळ संदेश देत नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण. समाजातील एकतेची आणि

Ameet Satam : "अदानींची प्रगती टोचते, मग कोहिनूर स्क्वेअर कसं उभं राहिलं?" अमित साटम यांचा राज ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : "ठाकरे बंधूंना अदानींच्या प्रगतीची समस्या नसून, स्वतःची 'आमदानी' कमी झाल्याचे हे दु:ख आहे. मराठी माणसाचा