प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. निवडणुकीसाठी प्रचारासाठी असलेला कालावधी सायंकाळी संपुष्टात आला आणि मागील काही दिवसांपासून कानावर पडणारा मतदार बंधू भगिनींनो हा आवाज शांत झाला. त्यामुळे प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे उमेदवार आणि कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी सुटकेचा निश्वास टाकला असून आता प्रतीक्षा आहे ती येणाऱ्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची. या दिवशी जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची रणनिती आखली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्यावतीने तसेच अपक्षांसह तब्बल १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी मागील ३ जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात झाली होती आणि प्रचाराची सांगता मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता झाली आहे.

 

मागील दहा ते अकरा दिवसांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जाहीर सभांसह घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर दिला आहे. मागील अकरा दिवसांमध्ये उमेदवारांनी घरोघरी प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि जाहीर सभांद्वारेही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे घराेघरी प्रचारासाठी विविध शक्कल लढवत प्रचार करतानाच आपली प्रचार पत्रके वाटली आणि याद्वारे यापूर्वी केलेली कामे तसेच पुढील पाच वर्षांतील व्हिजन मतदारांपुढे ठेवले. मुंबईतील रविवारी ठाकरे बंधूंची तर सोमवारी भाजप आणि शिवसेना महायुतीची सभा झाल्यामुळे या दोन्ही दिवशी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा एक दिवस वाया गेला.त्यामुळे शेवटच्या दिवशी अनेकांनी बाईक रॅली तसेच मोठ्याप्रमाणात प्रचार करता वस्त्यावस्त्यांमध्ये तसेच घरोघरी जात प्रचार करण्यावर भर दिला.

 

राजकीय पक्षांचे उमेदवार


भाजपा :१३७

शिवसेना: ९०

उबाठा :१६३

मनसे : ५३

राष्ट्रवादी (शप): ११

काँग्रेस :१३९

वंचित बहुजन : ६२

रासप : १०

रिपाइं : ३९

राष्ट्रवादी काँग्रेस : ९४

समाजवादी पक्ष :९०
Comments
Add Comment

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर