रायसीना हिल्सजवळ पंतप्रधान मोदींचे नवे कार्यालय

निवासस्थानही बदलणार


नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रायसीना हिल्स परिसरातील नवे कार्यालय आता पूर्णपणे तयार झाले असून, या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान तेथे स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग असलेल्या या नव्या संकुलाला ‘सेवा तीर्थ’ असे नाव देण्यात आले आहे. ‘सेवा तीर्थ’ संकुलाची वैशिष्ट्ये अशी आहे की, या संकुलात एकूण तीन मुख्य इमारती आहेत. सेवा तीर्थ येथे पंतप्रधानांचे मुख्य कार्यालय (PMO) असेल. दुसरे सेवा तीर्थ येथे कॅबिनेट सचिवालयाचे कामकाज चालेल. सेवा तीर्थ तीनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कार्यालय असेल. नव्या पीएमओमध्ये ‘ओपन फ्लोअर मॉडेल’चा वापर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे कामकाजाच्या संस्कृतीत सकारात्मक बदल घडून येईल. याशिवाय, परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि बैठकांसाठी हाय-टेक खोल्या तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानासोबतच हिंदुस्थानी संस्कृती आणि परंपरेची झलक पाहायला मिळेल.

स्वातंत्र्यापासून पंतप्रधानांचे कार्यालय ‘साउथ ब्लॉक’मध्ये होते. आता हे कार्यालय ‘सेवा तीर्थ’मध्ये हलवण्यात येत आहे. जुन्या नॉर्थ आणि साउथ ब्लॉकच्या इमारतींमध्ये आता ५००० वर्षांचा हिंदुस्थानचा इतिहास सांगणारे एक भव्य संग्रहालय उभारले जाणार आहे. या संग्रहालयाचा पहिला टप्पा पुढील वर्षाच्या सुरुवातीला खुला होण्याची शक्यता आहे.

निवासस्थानही बदलणार

पंतप्रधानांचे नवे निवासस्थानही या कार्यालयाजवळच बांधले जात आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान ७, लोककल्याण मार्ग हे आपले सध्याचे निवासस्थान सोडून नव्या घरात वास्तव्यास येतील. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयात स्थलांतर करण्यासाठी या महिन्यात दोन मुहूर्त काढण्यात आले आहेत. पहिला १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या दिवशी आणि दुसरा १९ जानेवारी ते २७ जानेवारीदरम्यान, गुप्त नवरात्रीपर्यंत आहे. तथापि, तोपर्यंत जर फिनिशिंगचे काम पूर्ण झाले नाही, तर फेब्रुवारीमध्येही कोणतीही तारीख निश्चित केली जाऊ शकते.

सेंट्रल विस्टा प्रकल्प काय आहे?

सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत अनेक इमारतींचा पुनर्विकास आणि बांधकाम समाविष्ट आहे. यात नवीन संसद भवन, मंत्रालयाच्या कार्यालयांसाठी केंद्रीय सचिवालय, पंतप्रधान निवासस्थान, उपराष्ट्रपती निवासस्थान यांचे बांधकाम केले जाणार आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्पाची घोषणा सप्टेंबर, २०१९ मध्ये झाली होती. १० डिसेंबर, २०२० रोजी पंतप्रधान मोदींनी प्रकल्पाची पायाभरणी केली होती. सरकारने संपूर्ण प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. कर्तव्य पथाच्या दोन्ही बाजूंच्या परिसराला सेंट्रल विस्टा म्हणतात.
Comments
Add Comment

टाकाऊ कपड्यांतून साकारली कलाकृती; पंतप्रधान मोदीचं ६ फूट पोर्ट्रेट चर्चेत

ब्रह्मपूर (ओडिशा):येथील तरुण फॅशन डिझायनर्सनी आपल्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून एक अनोखी कलाकृती साकारत

काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक; एनआरआय महिलेच्या तक्रारीवरून तिसरं प्रकरण उघड

पथनमथिट्टा (केरळ) : काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि आमदार राहुल ममकुटाथिल यांना महिलेशी गैरसंबंधान बाबत गंभीर

ताजमहालचे तळघर उघडणार! ३ दिवस मोफत पाहण्याची संधी

उर्सच्या कालावधीत पर्यटकांना आणि भाविकांना विशेष सवलती आग्रा: जगातील सातवे आश्चर्य मानल्या जाणाऱ्या

जि. प. निवडणुका फेब्रुवारीत

सर्वोच्च न्यायालयाकडून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ नवी दिल्ली :राज्यातील सर्व स्थानिक

पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार, २८ जानेवारी रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होणार

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष

इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी, १६ उपग्रह अंतराळात बेपत्ता

नवी दिल्ली : इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी झाले. PSLV-C62 मोहिमेपूर्वी, गेल्या वर्षी C61 देखील अयशस्वी झाले.