सीताराम राणे यांचा करणार प्रचार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आज (१३ जानेवारी) ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी १०.३० वाजता प्रचार रॅली आयोजित करण्यात आली असून, भाजपने या रॅलीसाठी विशेष तयारी केली आहे. प्रभाग ५ मध्ये रॅलीमध्ये मंत्री नितेश राणे सहभागी होणार आहेत. शिवाई नगर, वसंत विहार, उपवन, पवार नगर आणि कोकणीपाडा या भागातून रॅली काढण्यात येईल.
भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीने महापालिकेच्या निवडणुकीत मविआ आघाडी आणि ठाकरे सेनेसमोर कडवे आव्हान उभे केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांसमोर विकासाचे व्हिजन सादर केल्यानंतर आता मंत्री नितेश राणे प्रचारासाठी ठाण्यात येत आहेत.
भाजप प्रवक्ते सागर भदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी आणि रॅलीमध्ये प्रचंड प्रमाणात उपस्थित राहून प्रचारात सहकार्य करावे.