Gold Silver Rate Update:सोन्याचांदीत सलग तिसऱ्यांदा विक्रमी वाढ! सोने १४२००० व चांदी २७५००० पार....

मोहित सोमण: सोन्याचांदीच्या दरात आजही तुफान वाढ झाली आहे. सलग तिसऱ्यांदा ही वाढ झाली असून इराण व युएस यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे बाजारातील नकारात्मक वातावरणाला गती मिळाली आहे. त्यामुळे कमोडिटीतील सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचांदीच्या मागणीत भरगच्च वाढ झाल्याने पुन्हा एकदा दरवाढ झाली. उपलब्ध गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३८ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २९ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४२५३ रूपयांवर, २२ कॅरेट सोन्यासाठी १३०६५ रूपयांवर, १८ कॅरेट सोन्यासाठी १०६८९० रूपयांवर पोहोचले आहेत. याशिवाय प्रति तोळा दर पाहिल्यास, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ३८० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ३५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात २९० रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४२५३० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १३०६५० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०६९०० रूपयांवर पोहोचले आहेत.


भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) सोन्याचा निर्देशांकात दुपारी १२.३० वाजेपर्यंत ०.३६% वाढ झाली असून दरपातळी १४१५२७ रूपयांवर पोहोचले आहेत. तर संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४२५३ रूपये, २२ कॅरेटसाठी १३१७० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०६९० रूपयांवर पोहोचले आहेत. १० जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम २९५ रूपयांनी वाढले असतं प्रति तोळा दरात १० दिवसात १७०० रूपयांनी वाढले आहे.


चांदीच्या दरातही मोठी वाढ कायम !


सोन्याप्रमाणे अस्थिरतेतील सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीला प्राधान्य मिळत असताना दुसरीकडे औद्योगिक कमोडिटी बाजारात व औद्योगिकीकरणात चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. आज चांदीतही मोठी वाढ झाली. संकेतस्थळावरील माहितीनुसार,चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ५ रूपये, प्रति किलो ५००० रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे प्रति ग्रॅम दर २७५ रूपये, प्रति किलो दर २७५००० रूपयांवर पोहोचले आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ०.८३% घसरण झाल्याने दरपातळी २६६७४१ रूपयांवर पोहोचले आहेत. तर माहितीनुसार भारतीय सराफा बाजारातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर मुंबईसह प्रमुख शहरात २७५० रूपयांवर व प्रति किलो दर २७५००० रूपयांवर पोहोचले आहेत.


यासह जागतिक अस्थिरतेत आगामी युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीबाबत उदासीनता तसेच आगामी युएस बाजारातील ग्राहक महागाई निर्देशांकातील आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार या आकडेवारीनंतर नव्या दिशा शेअर बाजारासह कमोडिटी बाजारात मिळू शकतात. सोन्याचांदीच्या दरासह तांबे, पितळे, व इतर कमोडिटी धातूंच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या ३ दिवसात १० जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान प्रति किलो दर २७००० रूपयांनी उसळले आहेत यातून चांदीचे महत्व अधोरेखित होते.

Comments
Add Comment

आयोगाच्या नियमामुळे गोंधळात गोंधळ,

प्रचार बंदी नंतरही उमेदवाराला गाजावाजा न करता प्रचार करता येणार? मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या

मतदानाला जाताना ओळखीच्या पुराव्यांपैंकी एक पुरावा बाळगा जवळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर

मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?

मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या

मुंबईतील ८५ लाख मतदारांना झाले मतदार ओळखपत्रांचे वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी

मुंबईत मतदान केंद्रासह परिसरही राखणार स्वच्छ

पुढील तीन दिवसांमध्ये राखली जाणार स्वच्छता मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र