मुंबई: उद्योजक व उद्योगपतीनी मोठ्या प्रमाणात आपले लक्ष्य गुजरात राज्यात केंद्रित केले आहे. 'वायब्रंट' गुजरात अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या ५ वर्षात ७ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक सौराष्ट्र कच्छ भागात तंत्रज्ञानात करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच अदानी समुहाच्या करन अदानी यांनी १.५० लाख कोटी रूपयांची गुंतवणूक सेझ (Special Economic Zone) मध्ये मुंध्रा कच्छ येथे करण्याची घोषणा केली होती. सीएनसी ऑटो यांनी १०००० कोटीची गुंतवणूक उत्पादन, संशोधन, विकास यामध्ये पुढील ५ वर्षांत करणार असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय वेलस्पून समुहाने पाइपलाइन उत्पादनात ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
आज मुकेश अंबानी यांनी सर्वसामान्यांसाठी एआय (Artificial Intelligence AI) पिपल फस्ट या व्यासपीठाची घोषणा केली आहे. गुजरातपासून त्याची सुरुवात होणार असून त्यानंतर इतर क्षेत्रीय भाषेत नागरिकांना एआयचा वापर करता येणार आहे असे जिओकडून स्पष्ट करण्यात आली आहे. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठा एआय प्रकल्प सेंटर लवकरच तयार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षांत ३.५० लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आली असून ती दुपटीने वाढवत ७ लाख कोटीची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे आश्वासन गुजरात राज्याला दिले आहे. अंबानी म्हणाले की, या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि गुजरात जागतिक नकाशावर ठळकपणे आपले स्थान निर्माण करेल. त्यांनी पाच महत्त्वाच्या घोषणा केल्या, ज्यात जामनगरमध्ये सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि शाश्वत विमान इंधनाचा समावेश असलेली जगातील सर्वात मोठी एकात्मिक हरित ऊर्जा प्रणाली उभारण्याचा समावेश आहे. ते म्हणाले की जामनगर हे हायड्रोकार्बन केंद्रातून हरित ऊर्जेचे एक प्रमुख निर्यातदार केंद्र म्हणून रूपांतरित होईल.
यासह ज्योती सीएनसी ऑटोने ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पराक्रमसिंह जडेजा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, 'व्हायब्रंट गुजरात' उपक्रम हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वसमावेशक, प्रदेश आधारित विकासाच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे आणि राजकोटमधील पहिली व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद (VGRC) सौराष्ट्र प्रदेशासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हटले आहे.
यापुढे बोलताना ज्योती सीएनसी भारताची औद्योगिक परिसंस्था मजबूत करण्यासाठी पुढील पाच वर्षांत उत्पादन विस्तार आणि संशोधन व विकास (R&D) मध्ये १०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. तसेच जडेजा म्हणाले की, ज्योती सीएनसीसाठी उत्पादन हे राष्ट्रनिर्माणाप्रती एक जबाबदारी आहे. त्यांनी एरोस्पेस, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादनावर लक्ष केंद्रित करून, 'आत्मनिर्भर भारत' आणि 'विकसित भारत २०२७' प्रति कंपनीची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
अदानी समूहाने पुढील पाच वर्षांत गुजरातच्या कच्छ प्रदेशात १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. उद्योग, लॉजिस्टिक्स आणि अक्षय ऊर्जेचे (Renewable Energy) प्रमुख केंद्र म्हणून राज्याचे स्थान अधिक मजबूत होईल असे अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी प्रसारमाध्यमांना कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे. ही आगामी गुंतवणूक नवी ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी, बंदरांची पायाभूत सुविधा आणि संबंधित औद्योगिक प्रकल्पांच्या विस्तारावर केंद्रित असेल असे त्यांनी म्हटले आहे. ही गुंतवणूक भारताच्या आर्थिक वाढ, शाश्वतता आणि ऊर्जा सुरक्षेच्या दीर्घकालीन प्राधान्यांशी सुसंगत आहे असे ते म्हणाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार समूह २०३० पर्यंत ३७ गिगावॉटचा खावडा नवीकरणीय ऊर्जा पार्क पूर्ण करेल आणि पुढील दशकात मुंद्रा बंदराची क्षमता दुप्पट करेल असे आश्वासन अदानी समुहाने यावेळी दिले.