मराठी माणसांचे महत्व मुंबईत कधीही कमी होणार नाही

दिशाभूल करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या खोटेपणाचा घेतला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाचार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे हित जोपासणारा हा मराठी माणूस आहे. हा एकनाथ शिंदे मराठी नाही का? हे देवेंद्र फडणवीस मराठी नाही का? मराठी माणसांचे महत्व मुंबईत कधीही कमी होणार नाही. महापौर हा महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईवर भगवा फडकणारच आणि तोही महायुतीचा भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यांचे दिवसभर नेटफ्लिकस आणि फावल्या वेळात पॉलिटिक्स अशा शब्दात जोरकस टीका ठाकरे बंधूंवर केली.





दादर छत्रपती महाराज मैदानात महायुतीच्या निवडणूक जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ही सभा त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नाही. पण मराठी माणसांसाठी त्यांनी काय यापेक्षा आम्ही काय केले हे आम्ही सांगतो. आम्ही महायुतीच्या सरकारने २० हजार इमारतीना ओसी देण्याचे काम केले... पागडीमुक्त मुंबई करण्याचा. निर्णय महायुतीन सरकारने घेतला. झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी १७ ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांना मंजुरी दिली. खड्डेमुक्त मुंबई करण्याचे काम आम्ही केले. पुढील वर्षात मुंबई खड्डे मुक्त दिसेल. यासाठी दोन टप्प्यात सिमेंट काँक्रीटकरणची कामे दोन टप्प्यात सुरू आहेत. अशी विविध कामांची जंत्री वाचून दाखवत एकनाथ शिंदे यांनी आम्ही स्वत:ची घरे भरणारे नाही आहोत, तर लोकांना घरे देणारे आहोत असे निक्षून सांगितले.


आधी कामे सुरु होती, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यांनंतर त्यांनी कामात स्पीडब्रेकर निर्माण केले. मेट्रो तीन प्रकल्प आधी अडकवला, तो स्पीड ब्रेकर आम्ही मुख्यमंत्री झाल्यावर हटवला. जिथे जिथे प्रकल्प कामात गतिरोधक निर्माण केले होते ते आम्ही हटवले आणि प्रकल्प कामांना गती दिली.पण यांनी प्रकल्प अडवल्याने तब्बल दहा हजार कोटींचा प्रकल्प खर्च वाढला. हा पैसा तुमचा
होता असे सांगत रखडलेल्या प्रकल्प कामामुळे कसा तिजोरीवर उद्धव ठाकरेंमुळे बोजा पडला याचा पाडा वाचला.


मुंबईतील एक लाख गिरणी कामगारंना मुंबई महानगरात परिसरात घर देणार असे स्वागत बंगल्यात राहणाऱ्यांना झोपडीधारकांचे दुःख काय करणार असा सवाल केला. आम्ही पोटतिडकीने काम करतो, आम्ही ऑनफिल्ड काम करणारे आहोत, तुम्ही घरी बसणारे आहात. तुम्हाला सर्वसामान्यांच्या वेदना काय करणार असा सवाल केला.


हे स्वार्थासाठी आधी वेगळे झाले आणि स्वार्थासाठी आता एकत्र आले अशा शब्दात ठाकरे बंधूंच्या युतीचा समाचार घेतलं. आम्ही आयत्या बिळावरचे नेते नाही आहोत. तर आम्ही कार्य करून मोठे झाले आहोत. आम्ही मंत्रीपद सोडून गेले, सत्तेवर पाणी सोडून गेलो, आम्ही युतीचे गठबंधन करून सरकार स्थापन केले., त्यांनी करून दाखवलं नाही तर खाऊन दाखवलं असे सांगत ठाकरेंचा समाचार घेतला.


Comments
Add Comment

कफनचोरांना जेलमध्ये पाठवणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा; ठाकरेंनी वडापावव्यतिरिक्त मराठी माणसाकरता कधी स्वप्न पाहिले

तब्बल ६० हजार मुंबईकरांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप

तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांचे प्रशिक्षण १० हजार २३१ मतदान केंद्रांची उभारणी मुंबई (विशेष

दुबार मतदारांपैंकी ४८ हजार मतदारांचा मतदानाचा मार्ग मोकळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या बनवताना दुबार मतदारांचा शोध घेण्यात येत

एका वेळी दोन प्रभागांचीच होणार मतमोजणी

मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी एका वेळी दोनच

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

निवडणूक काळात तब्बल ३ कोटी १० लाखांची रोख रक्कम जप्त

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित आचारसंहितेच्या काळात तब्बल ३ कोटी १० लाख १७ हजार २०