पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार, २८ जानेवारी रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होणार

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी १ फेब्रुवारी रोजीच सादर होणार असल्याचे स्षष्ट केले.यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. संसदेच्या पटलावर त्या आठव्यांदा अर्थसंकल्प ठेवणार आहेत. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेश हे २८ जानेवारी आणि २ एप्रिल दरम्यान दोन सत्रात होणार आहे.
केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजीजू यांनी याबाबतचा निर्णय सोशल मीडियावर शेअर केला. ते म्हणाले, 'भारत सरकारच्या शिफरसीनुसार भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ साठी दोन्ही सभागृहांचे सत्र भरवण्याची परवानगी दिली आहे. हे सत्र २८ जानेवारी रोजी सुरू होईल आणि पहिले सत्र १३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर दुसरे सत्र हे ९ मार्च रोजी सुरू होईल आणि २ एप्रिल रोजी संपेल. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशन आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होते.

Comments
Add Comment

इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी, १६ उपग्रह अंतराळात बेपत्ता

नवी दिल्ली : इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी झाले. PSLV-C62 मोहिमेपूर्वी, गेल्या वर्षी C61 देखील अयशस्वी झाले.

इंडिगो फ्लाईटला हवेत पक्षाची धडक! पायलटच्या प्रसंगावधानाने वाचले २१६ लोकांचे प्राण

वाराणसी : हवेत उड्डाण करत असताना इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाला पक्षाची जोरदार धडक बसल्याची गंभीर घटना

हिमाचल हादरलं! सोलनमध्ये स्फोट; पोलीस स्टेशनजवळ घडली घटना

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलन जिल्ह्यातील नालागढ पोलीस स्टेशनच्या

महाराष्ट्र झेडपी निवडणूक..!

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत दाखल याचिकांवर आज (१२ जानेवारी २०२६)

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६; देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवणार

मुंबई : देशाच्या राजकीय आणि आर्थिक हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं संसदचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

जम्मू–काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ घुसखोरीचा संशय

जम्मू : जम्मू–काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) जवळ घुसखोरीचा संशय निर्माण झाल्यानंतर