मुख्य मुद्दे
१. महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध 'दलिंदर आणि बिलंदर' जोडी:
एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे 'धुरंदर' नेतृत्व आहेत. याउलट, एक भाऊ जगात कोरोना आला असताना घरात बसून राहणारा 'दलिंदर', तर दुसरा 'खळखट्याक'ची भाषा करणारा 'बिलंदर' आहे. महाराष्ट्राची जनता या 'रहमान डकैत' प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
२. केविलवाणी गर्दी आणि परिवार वाचवण्याची धडपड:
कालची सभा म्हणजे विचारांचे मंथन नव्हते, तर आपला परिवार आणि राजकीय अस्तित्व वाचवण्याची केविलवाणी धडपड होती. सभेत लोकांचा उत्साह नव्हता, तर 'कंटाळवाणी' भाषणं आणि 'लाचार' माणसं दिसत होती.
३. अदानींवर टीका आणि पवारांशी मैत्री – हे कसले दुटप्पी धोरण?
गौतम अदानींवर टीका करायची, पण त्यांच्याच गाडीचे सारथ्य करणाऱ्या रोहित पवारांशी आणि अदानींना मार्गदर्शक मानणाऱ्या शरद पवारांशी युती करायची? हे 'दुतोंडी' वागणं महाराष्ट्र बघतोय. राजकीय स्वार्थासाठी स्वतःची तत्त्वं गहाण ठेवणं कधी बंद करणार?
४. निवडणुका आणि 'मराठी माणूस' नावाचे कार्ड:
केवळ निवडणुका आल्यावरच तुम्हाला 'मराठी माणूस' का आठवतो? सत्ता असताना मराठी माणसासाठी काय केलं? राज्याच्या हितापेक्षा तुम्हाला स्वतःच्या खुर्चीची काळजी जास्त आहे.
५. राजकीय 'केमिकल लोच्या' आणि भूमिकेचा अभाव:
लोकसभेत बिनशर्त पाठिंबा, विधानसभेत विरोध आणि महापालिकेत पुन्हा एकत्र? तुमचा नक्की 'केमिकल लोच्या' झाला आहे का? जनतेला वेड्यात काढण्याचे धंदे आता चालणार नाहीत. कधी भोंग्यांच्या विरोधात बोलायचं तर कधी हिंदुत्वाचं सोंग घ्यायचं, हे ढोंग जनता ओळखून आहे.
६. बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना देणारे राजकारण:
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा 'जनाब बाळासाहेब' करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? राम मंदिर आणि कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. सोनिया गांधींच्या चरणी नतमस्तक होताना साहेबांच्या आत्म्याला किती यातना झाल्या असतील, याचा विचार करा.
७. कामातून उत्तर – शिंदे साहेबांचा झंझावात:
मुंबई तोडण्याची 'शिळी कढी' किती दिवस गरम करणार? गेल्या २५ वर्षांत जे झालं नाही, ते अडीच वर्षांत शिंदे साहेबांनी करून दाखवलं. कोस्टल रोड, अटल सेतू, धारावी पुनर्विकास आणि मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात दर्जा' ही आमची उत्तरं आहेत. जपानमध्ये मराठी भवन आणि महाराष्ट्राला स्वतःचं राज्यगीत मिळवून देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं.
"बाप के विचार बेचने वालो पर हर कोई शर्मिंदा है,
खिचडी, पत्राचाळ और बॉडी बॅग घोटालों का इनका काला धंदा है!
फेसबुक लाईव्ह करने वालो की हर कोई करता निंदा है,
लेकिन याद रखना, मुंबई और महाराष्ट्र को बचाने के लिए टायगर (एकनाथ शिंदे) अभी जिंदा है!”