गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकच बीच, तोच टॉवेल आणि जवळपास समान फ्रेममध्ये दोन वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर झालेले फोटो आणि त्यामुळेच सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस पडलाय हा केवळ योगायोग की काहीतरी वेगळंच?


सध्या कार्तिक आर्यन आपल्या आगामी सिनेमांपेक्षा गोव्यातील सुट्टीमुळे अधिक चर्चेत आहे. कार्तिकने शेअर केलेल्या व्हेकेशन फोटोंनंतर काही वेळातच एका तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. विशेष म्हणजे हे फोटोही अगदी त्याच लोकेशनवरून असल्याचं दिसून आलं आणि तिथूनच चर्चांना उधाण आलं.



मिस्ट्री गर्ल’ कोण?


या तरुणीचं नाव करिना कुबिलियूट असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कार्तिक आर्यन आणि करिना हे दोघेही गोव्यातील सेंट रेजिस हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, दोघांची राहण्याची व्यवस्था वेगवेगळ्या खोल्यांमध्ये होती असे करिनाने स्पष्ट केले आहे.


काही जण तिला यूकेमध्ये शिक्षण घेणारी १८ वर्षांची विद्यार्थिनी असल्याचं सांगत आहेत, तर काही रिपोर्ट्समध्ये तिच्या वयाबाबत वेगळी माहिती दिली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान, या सगळ्या चर्चांवर कार्तिक आर्यनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर करिनाने काही काळासाठी आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये, “मी कार्तिक आर्यनला ओळखत नाही,” असं लिहिलं होतं. नंतर तिने ते वाक्य हटवलं.



योगायोग की चर्चेचा नवा अध्याय?


गोव्यात घडलेला हा प्रकार केवळ योगायोग आहे की त्यामागे काही वेगळीच गोष्ट आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सध्या तरी कार्तिक आर्यन, करिना आणि गोव्याचा बीच हे कोडं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय

अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक

अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता

तारा सुतारीया आणि वीर पहारिया यांच्या ब्रेकपची रंगली चर्चा, सोशल मीडियावर एकमेकांना केले...

मुंबई : अभिनेत्री तारा सुतारीया आणि वीर पहारिया हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे कपल एकमेकांना वर्षभरापासून डेट

O Romio Teaser : खतरनाक टॅटू, हातात बंदूक अन् क्रूर हास्य...शाहिद कपूरचा ‘ओ रोमिओ’मधील रक्तरंजित अवतार पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूडमध्ये २०२६ सालाची सुरुवात अत्यंत दिमाखदार झाली असून, सध्या एकाच चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली

गेल्या चार वर्षांपासून ओटीटीवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे 'ही' वेब सीरीज.

Wednesday : चित्रपटांसोबत आता ओटीटी हे मनोरंजनाचं माध्यम बनलं आहे. सध्या ओटीटी वर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज,

चि व चि. सौ. का”ची हिट जोडी मराठी - जपानी रोमँटिक चित्रपटात

मुंबई : मानाच्या २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या