२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्यावतीने जाहीर करण्यात येणारा वचननामा हा महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्याकामांच्या संदर्भात असणे स्वाभाविक मानले जाते; परंतु २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या उबाठाला आणि २५ वर्षे विरोधी पक्षांत बसणाऱ्या काँग्रेस पक्षाला मुंबई महापालिकाच कळलेलीच नाही. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित कोणतीह कामे येतात आणि कोणती कामे सरकारच्या अखत्यारित येतात याची माहितीच न झाल्याने दोन्ही पक्षांनी आपले वचननामे बनवतानाच महापालिकेशी तीळमात्र संबंध नसलेल्या कामांचा समावेश आपल्या वचननाम्यांमध्ये केल्याचे पाहायला मिळाले आहे.
आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसे तसेच काँग्रेस आणि वंचितने जाहीर केलेला वचननाम्यातील निम्मी आश्वासने ही महापालिकेच्या अखत्यारित येत नसून राज्य सरकारच्या अखत्यारितील दिसून येत आहे. त्यामुळे उबाठा आणि मनसे तसेच काँग्रेस आणि वंचित हे नक्की महापालिकेची निवडणूक लढवायला चालले आहेत का? की विधानसभेच्या निवडणुकीतून अजून बाहेरच पडलेले नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. युती आणि आघाडीने जाहीर केलेल्या वचननाम्यांमध्ये महापालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश असणे स्वाभाविक मानले जाते . परंतु दोन्ही पक्षांनी मांडलेल्या वचननाम्यांमध्ये सरकारच्या मदतीशिवाय आणि परवानगीशिवाय न होणाऱ्या कामांचा तथा सरकारच्यावतीने निर्णयानुसार केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे एकप्रकारे मुंबईकरांची महापालिकेच्या कामांशी संबंध नसतानाही केवळ गाजरे दाखवून फसवणू करण्याचे काम करण्याचा प्रयत्न युती आणि आघाडीकडून केले जात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
- उबाठा आणि मनसेच्या वचननाम्यातील या आश्वासनांचाा महापालिकेशी काय संबंध?
- घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये स्वाभिमान निधी देणार.
- कष्टकरी मुंबईकरांसाठी दहा रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी माँसाहेब किचन्स सुरू करणार.
- १ लाख तरुण तरुणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी देणार.
- २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार.
- महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सी.डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करणार.
- दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार.
- मुंबई महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील ग्रंथालय उभारलं जाईल.
काँग्रेस आणि वंचितचा जाहीरनाम्याचा पालिकेशी काय संबंध?
- नवीन, आधुनिक बाजारपेठांची उभारणी करणार
- क्लस्टर पुनर्विकासासाठी ४ हजार चौरस मीटर ऐवजी ३ हजारचा पर्याय देणार
- कोळीवाडा व गावठाणांसाठी विशेष विकास धोरण आखणार
- मुंबईत अधिक अंगणवाड्या सुरू करणार
- औद्योगिक व व्यावसायिक धूर नियंत्रण करणार