महापौर ‘दोस्ती का महागठबंधना’चाच होणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास


उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच मराठी आणि सिंधी समाज एकत्र येत ‘दोस्ती का महागठबंधन’ उभे राहिले असून, याच आघाडीचा महापौर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


शहरातील गोलमैदान येथे आयोजित शिवसेना–टीओके (ओमी कलानी), साई पक्ष (जीवन इदनानी), रिपाइं आठवले गट, पीआरपी (प्रा. जोगेंद्र कवाडे) आणि रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) यांच्या ‘दोस्ती का गठबंधन’च्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. विकास हाच आमचा एकमेव अजेंडा असून, तो फास्टट्रॅकवर राबवला जाईल, असा निर्धारही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. सभेत शिंदे यांनी मराठी आणि सिंधी समाजातील सांस्कृतिक एकतेवर भाष्य करताना, “सिंधी बांधवांचा दाल-पक्वान आणि मराठी बांधवांचा वडापाव यांची युती झाली आहे,” असे म्हणत सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण केला.


आपल्या कार्यकाळाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री काळात अडीच तासही शांत झोप घेतली नाही. कारण काहींच्या झोपा उडवण्यासाठीच मी काम करत होतो,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला. उल्हासनगरमध्ये सध्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असून, आणखी अनेक योजना लवकरच राबवण्यात येणार आहेत. विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देत, ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर विकास योजना उल्हासनगरमध्ये राबविण्यात येणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.


या सभेला माजी आमदार पप्पू कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, टीओकेचे प्रमुख ओमी कलानी, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर, पीआरपीचे जयदीप कवाडे, माजी महापौर लीलाबाई आशान, आशा इदनानी, पंचम कलानी, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी, जमनू पूरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखिजा यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

Comments
Add Comment

MHADA Thane : ठाण्यात म्हाडाची घरं आता स्वस्त! ४४ ते ४६ लाखांत मिळणार सदनिका; नव्याने निघणार लॉटरी

ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती आता कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री

Dog bite incident in Kalyan : कल्याणमध्ये एकाच पिसाळलेल्या भटक्या श्वानाचा धुमाकूळ; अवघ्या सात तासांत तब्बल १३० जणांना घेतला चावा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हाॅटेल भागात रविवारी दुपारपासून एका पिसाळलेल्या

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८

Vinayak Raut : सुनेने केलेल्या कौटुंबिक छळ अन् अंधश्रद्धेच्या आरोपांवर सुनावणी; विनायक राऊतांना कोर्टाकडून अटकपूर्व जामीन

ठाणे : माजी खासदार आणि शिवसेना (UBT) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांना ठाणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

'क्राइम पेट्रोल'मध्ये पोलिसाची भूमिका; पण खऱ्या आयुष्यात २५ लाखांचा गंडा! अभिनेत्यावर नक्की काय ओढावलं?

डोंबिवली : गुन्हेगारीच्या सत्य घटनांवर आधारित प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्राइम पेट्रोल'च्या (Crime Patrol) माध्यमातून

Kalyan News : कल्याणमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार; रेबीजचे इंजेक्शन देताना चिमुरड्याच्या कमरेत अडकली तुटलेली सुई!

कल्याण: कल्याण पूर्व भागातून आरोग्याशी संबंधित एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.