Dombivli News : डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर फेरीवाल्यांची गर्दी, पादचाऱ्यांचे हाल

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेला स्टेशनकडे येण्याजाण्याच्या सर्व लहानमोठ्या रस्त्यांवर फेरीवाल्यांची आणि छोट्या दुकानांची गर्दी झाली आहे. अनेक व्यावसायिक अनधिकृतरित्या रस्त्यावरच व्यवसाय करत आहेत. यामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात येणे जाणे कठीण झाले आहे. फेरीवाला हटाव पथकाला सर्व काही माहिती आहे पण ते वेळकाढूपणा करतात आणि कारवाई टाळतात. यामुळे परिस्थितीत अधिकाधिक बिकट होत आहे.

ग प्रभागाच्या अंतर्गत डॉ. रॉथ, उर्सेकरकर वाडी, रामनगर वाहतूक शाखा रस्ता येतो. या प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगार हे पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सात वाजल्यापासून टिंगलटवाळ्या करत बसलेले असतात. अनेक पादचारी पालिका कार्यालयात येऊन ग प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील कामगारांना डॉ. रॉथ रस्ता, मधुबन गल्ली रस्ता, उर्सेकरवाडी भागातील रस्ता, रामनगर वाहतूक शाखा ते स्वामी समर्थ मठ भागातील फेरीवाले रस्त्यावरून उठवा म्हणून मागणी करत आहेत.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग प्रभागातील काही कर्मचारी राजकीय दबावाखाली काम करत आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. निवडणूक काळाचा गैरफायदा घेत फेरीवाल्यांनी रस्ते अडवून व्यवसाय सुरू केल्याचे चित्र आहे. “पालिका प्रशासनाने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांना आंदण दिला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

 

 
Comments
Add Comment

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे