अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता ‘केस नं.७३’ या आगामी चित्रपटातून ते एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपटात मनोवैज्ञानिक डॉ.श्रीकांत ही व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक शिंदे बऱ्याच काळानंतर मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. अशोक शिंदे यांनी आजवरच्या अभिनय प्रवासात आपल्या अष्टपैलूत्वाने विविध भूमिकांमध्ये रंग भरले आहेत.
‘केस नं. ७३’ चित्रपटाचा गूढ टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून भय, वास्तव आणि भ्रमाच्या विळख्यातील नेमकं ‘रहस्य’ काय असणार? डॉ.श्रीकांत हे गूढ रहस्य उलगडू शकणार का ? की तेच या रहस्याचा एक भाग आहेत, हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. प्रसिद्ध मनोवैज्ञानिक असलेल्या डॉ.श्रीकांत ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी आव्हानात्मक होतीच पण सोबत अभिनेता म्हणून आनंद देणारी होती, प्रेक्षकांनाही ही भूमिका नक्की आवडेल असं अशोक शिंदे सांगतात.
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत. अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची आहे. मंदार चोळकर यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून संगीत आणि पार्शवसंगीताची जबाबदारी अमेय मोहन कडू यांनी सांभाळली आहे. छायांकन निनाद गोसावी यांचे आहे.