सुझुकीने लाँच केली इलेट्रीक स्कूटर e-Access, किती आहे किंमत ?

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची वाढलेली क्रेझ पाहून जपानची दिग्गज कंपनी सुझुकीने इलेक्ट्रिक स्कूटर 'Suzuli e-Acess' भारतात लाँच केली आहे.


सुझुकीने ओला नाही तर किमान बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब, एथर, हिरो होंडा यासारख्या कंपन्यांच्या स्कूटरची किंमती सारखी किंमत ठेवायला हवी होती, परंतु त्यांनी तसे केले नाही. यामुळे ९५ किमीच्या रेंजसाठी कितीजण दोन लाख रुपये मोजणार हे लवकरच समजणार आहे.


सुझुकी ई अॅक्सेस या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १. ८८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या स्कूटरसोबत कंपनीने तब्बल ७ वर्षाची वॉरंटी आणि बाय-बॅक गॅरेंटी देऊन ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. सुझुकी e-Access ही भारतातील अशा मोजक्या स्कूटर्सपैकी एक आहे, ज्यामध्ये ३ kwh क्षमतेची LEP बॅटरी वापरण्यात आली आहे. सामान्य NMC बॅटरीच्या तुलनेत LEP बॅटरीचे आयुष्य जास्त असते आणि ती अधिक सुरक्षित मानली जाते.


प्रमुख वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स


१ रेंज : सिंगल चार्जमध्ये ९५ किमी धावण्याचा दावा.
२ इंजिन आणि टॉर्क : ४. kW ची मोटार आणि १५ Nm टॉर्क. ज्यामुळे शहरात चालावताना उत्तम पिकअप मिळेल.
३ रायडींग मोड्स : इको, राईड A आणि राईड B असे तीन मोडस. त्यासोबत रिव्हर्स असिस्ट आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग
४ मेंटनन्स-फ्री बेल्ट ड्राइव्ह : यामध्ये ७०,००० किमी किंवा ७ वर्षापर्यंत देखभाल करण्याची गरज नसलेला ड्राइव्ह दिला आहे.

Comments
Add Comment

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे

अंबरनाथ नगर परिषद शिवसेनेने राखली

उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेत सोमवारी उपनगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठी राजकीय