टपाली मतदानासाची सुविधा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात

मतदान केंद्रांवरील मुलभूत सुविधा आणि मनुष्यबळांची जबाबदारी उपायुक्त, सहायक आयुक्तांवर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ करता निवडणूक कर्तव्‍यावर कार्यरत कर्मचा-यांकरीता टपाली मतदानाची सुविधा मध्‍यवर्ती निवडणूक कार्यालय येथे करण्‍यात आली आहे. निवडणूक कर्तव्‍यावरील कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बाजावता यावा यासाठी टपाली मतदानाचाी सुविधा देण्यात आली आहे. तरी निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अधिकारी - कर्मचारी, पोलिस अंमलदार यांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा,असे आवाहन महापलिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी केले आहे.


मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ करता मतदान केंद्रांवरील मुलभूत सुविधा सुनिश्चित करणे तसेच मनुष्यबळाचे नियोजन व व्यवस्थापन प्रभावीपणे पार पाडणे ही जबाबदारी उप आयुक्त व सहायक आयुक्त यांची राहील. याबाबत कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. निवडणूक प्रचार कालावधी मंगळवारी साडेपाच वाजता संपुष्टात येताच जाहीरात फलक, झेंडे, प्रचार साहित्य व तत्सम सर्व साहित्य तातडीने काढून टाकावेत. कोणताही विलंब अथवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असेदेखील डॉ. अश्विनी जोशी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.


मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या अनुषंगाने महानगरपालिका उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांची समन्‍वय बैठक शनिवारी १० जानेवारी २०२६ रोजी संपन्‍न झाली. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी अध्‍यक्षस्‍थानी होत्‍या. महानगरपालिका मुख्‍यालयात पार पडलेल्‍या या बैठकीस विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (कोकण विभाग) फरोग मुकादम, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळे यांच्‍यासह परिमंडळ उप आयुक्‍त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्‍त उपस्थित होते.



मतदानाच्या दिवशी साडेचार हजार स्वयंसेवक तैनात


मतदान केंद्र व आजूबाजूचा परिसर स्‍वच्‍छ व सुंदर ठेवावा. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय वातावरणात पार पडेल याची सर्वोतोपरी खबरदारी घ्‍यावी. मतदानाच्‍या दिवशी सुमारे ४ हजार ५०० स्‍वयंसेवकांची नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे. मतदार रांग लावणे, गर्दी व्‍यवस्‍थापन, दिव्‍यांग / ज्‍येष्‍ठ नागरिकांना मदत करणे आदींंसाठी त्‍यांचे सहकार्य घ्‍यावे. मतदानानंतर मतदान साहित्‍य, मतदान यंत्रे अभिरक्षा कक्ष पर्यंत पोहोचविण्‍याकामी वाहतूक व्‍यवस्‍था तैनात आहे. या वाहनांसाठी वाहनतळ सुविधा उपलब्‍ध करून द्यावी. त्‍याबाबत पोलिस, वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्‍याशी समन्‍वय साधावा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी केंद्र आराखडा, विविध सुविधांचा प्रस्‍ताव सादर केला आहे. परिमंडळ उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी त्‍याबाबतचे सुनियोजित व्‍यवस्‍थापन करावे.

Comments
Add Comment

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी

अटीतटीच्या लढतींतही महायुतीच पुढे

हवा दक्षिण मुंबईची सुहास शेलार  कुर्ला पश्चिमेला असलेल्या 'एल' महापालिका कार्यालयाअंतर्गत कुर्ला, चांदीवली

मुंबईत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहरे मैदानात

भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता

मतदानाच्या दिवशी सुट्टी नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

तपासणीसाठी पालिकेच्यावतीने दक्षता पथकांची स्थापना मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६