O Romio Teaser : खतरनाक टॅटू, हातात बंदूक अन् क्रूर हास्य...शाहिद कपूरचा ‘ओ रोमिओ’मधील रक्तरंजित अवतार पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूडमध्ये २०२६ सालाची सुरुवात अत्यंत दिमाखदार झाली असून, सध्या एकाच चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे, तो म्हणजे शाहिद कपूरचा 'ओ रोमीओ'. साजिद नाडियादवाला यांची निर्मिती आणि दिग्गज दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा 'टीझर' नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.



शाहिद कपूरचा कधीही न पाहिलेला लुक




या चित्रपटाच्या पोस्टरने आधीच खळबळ उडवून दिली होती. अंगावर काढलेले विचित्र टॅटू, रक्ताने माखलेला चेहरा आणि चेहऱ्यावरचं ते क्रूर हास्य... शाहिद कपूरचा हा 'डार्क' अवतार पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. शाहिद या चित्रपटात एका अत्यंत आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट होत आहे. केवळ शाहिदच नाही, तर या चित्रपटातील इतर कलाकारांमुळेही प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॉलिवूडची सध्याची 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरी या चित्रपटात शाहिदसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच, दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांची शक्तिशाली भूमिका या चित्रपटाला एक वेगळीच उंची देणार आहे. विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर ही जोडी याआधी 'कमीने' आणि 'हैदर' सारख्या दर्जेदार चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आली आहे, त्यामुळे 'ओ रोमीओ' हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठा 'हिट' ठरेल, असा अंदाज चित्रपट तज्ज्ञांनी वर्तवला आहे.



१ मिनिट ३५ सेकंदांचा जबरदस्त टीझर रिलीज


चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून अभिनेता शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित 'ओ रोमिओ' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ मिनिट ३५ सेकंदांच्या या टीझरमध्ये माफियांच्या जगातील एक गडद आणि हिंस्र वास्तव दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट केवळ ॲक्शन नाही, तर प्रेम आणि तीव्र शत्रुत्वावर आधारित एक 'डार्क थ्रिलर' असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. टीझरची सुरुवातच शाहिद कपूरच्या अतरंगी लूकने होते. अंगावरचे टॅटू, हातात बंदूक आणि डोळ्यांत दिसणारा सूडाचा अग्नी शाहिदच्या 'माफिया' प्रतिमेला अधिक गडद करतो. त्याचा हा लूक पाहून चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. शाहिदच्या आजवरच्या कारकिर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक आणि हिंस्र भूमिका ठरण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची स्टारकास्ट. टीझरमध्ये एका एका कलाकाराची झलक दाखवण्यात आली आहे. यात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, कसदार अभिनयासाठी ओळखला जाणारा विक्रांत मेस्सी, ॲक्शन आणि ग्लॅमरचा तडका देणारी दिशा पटानी, तमन्ना भाटिया आणि अविनाश तिवारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचे समजते. तसेच अनुभवी अभिनेत्री फरीदा जलाल यांचीही छोटी पण महत्त्वाची झलक पाहायला मिळते. टीझरच्या शेवटी तृप्ती डिमरी अत्यंत वेगळ्या अंदाजात समोर येते, ज्यामुळे चित्रपटाच्या कथानकाबाबत गूढ वाढले आहे.



कधी होणार प्रदर्शन?


शाहिदच्या आगामी ‘ओ रोमिओ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रेमाचा सण असलेल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आणि चित्रपटाची व्याप्ती पाहता निर्मात्यांनी ही तारीख पुढे ढकलली आहे. आता ‘ओ रोमिओ’ १३ फेब्रुवारी २०२६ रोजी, म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या अगदी आदल्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धडाकेबाज एन्ट्री करणार आहे. या तारखेमुळे शाहिदच्या चाहत्यांसाठी हे एक मोठे 'व्हॅलेंटाईन सरप्राईज' मानले जात आहे. विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर ही जोडी चौथ्यांदा एकत्र काम करत आहे. याआधी त्यांनी ‘कमीने’, ‘हैदर’ आणि ‘रंगून’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यापैकी ‘कमीने’ आणि ‘हैदर’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात शाहिद नेहमीच एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसतो. ‘ओ रोमिओ’मधील त्याचा लूक पाहता, यावेळीही ही जोडी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणण्यासाठी सज्ज असल्याचे दिसतेय.

Comments
Add Comment

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय

अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक

अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता

तारा सुतारीया आणि वीर पहारिया यांच्या ब्रेकपची रंगली चर्चा, सोशल मीडियावर एकमेकांना केले...

मुंबई : अभिनेत्री तारा सुतारीया आणि वीर पहारिया हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे कपल एकमेकांना वर्षभरापासून डेट

गेल्या चार वर्षांपासून ओटीटीवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे 'ही' वेब सीरीज.

Wednesday : चित्रपटांसोबत आता ओटीटी हे मनोरंजनाचं माध्यम बनलं आहे. सध्या ओटीटी वर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज,

चि व चि. सौ. का”ची हिट जोडी मराठी - जपानी रोमँटिक चित्रपटात

मुंबई : मानाच्या २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या

Dhurandhar Box Office Collection Day 35: धुरंदर चित्रपटाचा ३५ व्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ...

धुरंदर: रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या या चित्रपटामुळे देशभर नव्हे तर जगभर कौतुक होत