मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत आजही शेअर बाजारात घसरणच सुरु आहे. सलग नवव्या सत्रात झाल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाल्याने सेन्सेक्स १०३.२४ व निफ्टी ४५.४० अंकांने घसरला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतही मोठी घसरण झाल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आजही युएसकडून संभाव्य लादल्या जाणाऱ्या ५००% टॅरिफचा परिणाम आज शेअर बाजारात प्रकर्षाने दिसत आहे. सकाळच्या सत्रात पीएसयु बँक,आयटी, तेल व गॅस निर्देशांक वाढ झाली असून इतर निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण मिडिया,फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, रिअल्टी निर्देशांकात झाली आहेत. सकाळच्या सत्रात इंडस टॉवर्स (२.६०%), पेट्रोनेट एलएनजी (२.५६%), इटर्नल (२.४५%), वोडाफोन आयडिया (२.४३%), माझगाव डॉक (१.९८%), इंटलेक्ट डिझाईन (१.८२%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण इलेकॉन इंजिनिअरिंग (१२.२४%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (४.७९%), ट्रायडंट (३.८०%), हिताची एनर्जी (३.५७%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (३.४०%), निवा बुपा हेल्थ (३.३७%), फोर्स मोटर्स (३.३२%), इंडिया सिमेंट (३.२४%) समभागात झाली आहे.