Big Boss Marathi 6 : सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'बिग बॉस मराठीचे स्पर्धक कोणकोण असणार आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीत 'बिग बॉस मराठीच्या सहाव्या भागाची सुरुवात होणार आहे. ११ जानेवारीपासून बीड बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना आतुरता आहे, की घरात नेमकं कोणकोण सहभागी होणार आहे. सोशल मीडियावर घरातील संभाव्य स्पर्धकांच्या याद्यांनी धुमाकूळ घातलाय .
कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडियावर या स्पर्धकांचा प्रोमो शेअर करण्यात आला . परंतु ग्लॅमरस अंदाजात समोर येणाऱ्या सुंदर तरुणीचा चेहरा मात्र अजून यात स्पष्ट दिसत नाही.पण त्यातूनही चाहते आपले अंदाज बांधत आहेत, फॅशनच्या जगतातील ही सुंदरी भल्या भल्यांवर भारी पडणार असं म्हणत कलर्स मराठीने कोण असेल बरं ही सुपर मॉडेल? असा प्रश्नच चाहत्यांनाच विचारला आहे.
ग्लॅमरस साडीत दारापाशी थांबलेली सुंदरी कोण?
कलर्स मराठीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक सुंदर तरुणी साडी नेसून ग्लॅमर्स अंदाजात दरवाजात उभी असल्याचे दिसतय., फॅशनच्या जगतातील ही सुंदरी भल्या भल्यांवर पडणार भारी असं असं कॅप्शन या प्रमोला देण्यात आलंय. या पोस्टच्या कंमेंट सेक्शनमध्ये चाहते वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले आहेत.काहींनी ही तरुणी युट्यूबर असल्याचं म्हटलंय. तर काही नाही अभिनेत्री उर्मिला निंबाळकर असेल असं वाटतंय. तर काहीजण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली राऊतचे नाव घेत आहेत.
पुन्हा एकदा बिग बॉस मराठीचं नवं पर्व गाजवण्यासाठी अभिनेता रितेश देशमुख सज्ज झाला आहे. रितेशला पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरले वाट पाहत आहेत. ११ जानेवारीपासून रोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांना बिग बॉस मराठीचा सहावा सिझन पाहता येणार आहे.