मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार


मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई विद्यापीठ आणि भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्व्हे ऑफ इंडिया) यांच्यात शैक्षणिक, संशोधन आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय भू-स्थानिक धोरण २०२२ अंमलबजावणीच्या अनुषंगाने या कराराचे महत्व अधोरेखित होणार असून, याअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत उभारण्यात येणारे सीओआरएस स्टेशन मुंबईसह पश्चिम विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर जीपीएस आधारित सर्वेक्षण, भू-मापन, मॅपिंग आणि स्थाननिर्धारण प्रक्रियेत अत्यंत उच्च अचूकता व विश्वासार्हता प्राप्त होणार आहे. शहरी नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प, पायाभूत सुविधा विकास, बांधकाम क्षेत्र, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.


सीओआरएस स्टेशनमुळे सेंटीमीटर-स्तरावरील अचूक स्थानिक माहिती रिअल-टाइम स्वरूपात उपलब्ध होणार असून, याचा लाभ शासकीय विभाग, खासगी सर्वेक्षक, अभियंते, संशोधक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. विशेषतः भूगोल, जिओ-इन्फॉर्मेटिक्स, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, संगणकीय अनुकूलन तसेच एआय/एमएल आधारित भू-स्थानिक संशोधनासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे. १७६७ साली स्थापन झालेला भारतीय सर्वेक्षण विभाग हा भारत सरकारचा सर्वात जुना वैज्ञानिक विभाग असून, देशासाठी अधिकृत व मूलभूत भू-स्थानिक माहिती उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण कार्ये विभागाच्या माध्यमातून केले जाते.


मुंबई विद्यापीठाची विस्तीर्ण भौगोलिक व्याप्ती, मोठी विद्यार्थी संख्या आणि सक्षम पायाभूत सुविधा लक्षात घेऊन भारतीय सर्वेक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाची भागीदार संस्था म्हणून निवड केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागातील सर्व प्राध्यापकांच्या पुढाकारामुळे हा सामंजस्य करार झाला आहे.

Comments
Add Comment

The Black Market : वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाडीबंदर परिसरात अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा शिधावाटप यंत्रणेने

Affordable rental houses : मुंबईत उभारणार भाडेतत्त्वावरील परवडणारी घरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे निर्देश मुंबई : मुंबईमध्ये नोकरी,

Non-Communicable Diseases : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Transport Minister Pratap Sarnaik's announcement : ठाणेकरांची हक्काची मेट्रो तीन महिन्यांत रुळावर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घोडबंदर रोडचे पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण मुंबई

Devendra Fadanvis : इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव मुंबई : ज्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीला यश, बंजारा टायगर आंदोलन मागे; मागण्यांवर सकारात्मक भूमिका

मुंबई : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू