बंडखोरी, नाराजीचा प्रस्थापितांना फटका

हवा दक्षिण मुंबईची


महेश पांचाळ :  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा परिसर हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात येतो. ही झोपडपट्टी सुमारे ५२० एकरांवर पसरलेली आहे. त्याचबरोबर मुंबई उपनगरे आणि मुंबई शहर जिल्ह्यातील अनेक भागांचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघातील माही,वडाळा,सायन कोळीवाडा,धारावी, चेंबूर,अणुशक्ती नगर असे सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात. एकूण या मतदारसंघात १४ लाख ७४ हजार ४०५ मतदार आहेत. या मतदारसंघात सुमारे ४.२ लाख मराठी भाषिक मतदार असून, उत्तरभारतीय मतदारांची संख्या सुमारे ५ लाखापेक्षा अधिक आहे. मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौध्दधर्मीयांची संख्याही लक्षणीय आहे. मुस्लिम मताची गोळाबेरीज झाल्याने उबाठाचे अनिल देसाई यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला होता. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्व संपले असून, काँग्रेसची परंपरांगत मते उबाठा सेनेला मिळणार नाहीत. उबाठा आणि मनसे यांनी मराठी माणूस आणि मराठी अस्मिता या मुद्द्यावर एकत्र येत भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीसमोर आव्हान उभे केले असले तरी, मनसे आणि उबाठातील अंतर्गत नाराजीचा फटका या दोन भावांच्या पक्षांना बसणार आहे. वरळी प्रभादेवी परिसरातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी संतोष धुरी यांनी कमळ हाती घेतल्याने माहिम मतदारसंघातील काही प्रभागांवर त्याचा परिणाम होणार आहे. ठाकरे बंधुंची युती न पटल्याने चेंबूर येथील मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक राजा चौगुले यांनी एकनाथ् शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. दक्षिण मध्य मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये (विशेषतः प्रभाग १९३, १९४, १९७) अधिकृत उमेदवारांविरुद्ध पक्षातीलच कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरल्याने मतांच्या विभाजनाचा धोका निर्माण झाला आहे.


माहीम विधानसभा मतदारसंघ: माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना भवन, शिवाजी पार्क, चैत्यभूमी, संयुक्त महाराष्ट्राचे दालन, स्वा. सावरकर स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या या मतदारसंघात १० महापालिकेचे प्रभाग येत असून उबाठा सेना आणि शिवसेना यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे. मराठी मतदारांची संख्या प्रत्येक प्रभागात मोठी असल्याने खरी शिवसेना कोणती हेसुध्दा निकालातून स्पष्ट होणार आहे. उबाठा सेनेच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी मनसेला उमेदवारी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेत निवडणूक लढवित आहेत.


महत्त्वाच्या लढती


प्रभाग १८२


माजी महापौर मिलिंद वैद्य उबाठा, राजन पारकर (भाजप)


प्रभाग १९२


यशवंत किल्लेदार (मनसे), प्रीती पाटणकर (शिवसेना)


प्रभाग १९१


माजी महापौर विशाखा राउत उबाठा, प्रिया सरवणकर (शिवसेना)


सायन कोळीवाडा विधानसभा : दक्षिण भारतीय मतदारांची मोठी संख्या पाहता, राजकीय पक्षांनी या समुदायाला प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला आहे. उदाहरणार्थ, भारतीय जनता पक्षाचे कॅप्टन आर. तमिळ सेल्वन हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातील दक्षिण भारतीय मतदारांबरोबर मराठी, उत्तरभारतीय, मुस्लिमाची मते निर्णायक ठरत आहेत. या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १७३ ची चर्चा आहे. भाजप आणि शिवसेना या महायुतीचे उमेदवार निवडणुक चिन्हावर उभे आहेत. हा प्रभाग यंदा महिला आरक्षित झाला आहे. महायुतीच्या वाटाघाटीत हा प्रभाग शिवसेनेला सोडण्यात आला होता. शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आपल्या पत्नी पुजा कांबळे यांना उमेदवारी दिली.मात्र,भाजपकडून दत्ता केळूसकर हे देखील आपल्या पत्नीसाठी प्रयत्न करीत होते.


प्रमुख लढती


प्रभाग १७१


राजेज्ञी शिरवडकर (भाजप), माधुरी भिसे (उबाठा)


प्रभाग १७३


पुजा रामदास कांबळे शिवसेना, शिल्पा दत्ता केळूस्कर भाजप, प्रणिता प्रकाश वाघदरे (उबाठा)


प्रभाग १७५


रेखा यादव (भाजप) हर्षदा पाटील (उबाठा), अनिता पाटोळे (काँग्रेस)


प्रभाग १७५


अर्चना कासले मनसे, मानसी मंगेश सातमकर (शिवसेना)


चेंबूर विधानसभा मतदारसंघ : चेंबूरमध्ये अनेक ठिकाणी नवीन उमेदवारांना तिकीट दिल्याने भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे अधिकृत उमेदवारांसमोरील आव्हान वाढले आहे चेंबूरमधील एकूण ५ प्रभागांमध्ये (१५१ ते १५५) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य लढत महायुती (भाजप, शिवसेना) विरुद्ध उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट, काँग्रेस अशी होत असून, मनसे आणि आप देखील रिंगणात आहेत. चेंबूर, गोवंडी आणि देवनार या भागात महिला उमेदवारांची संख्या सर्वाधिक (सुमारे ६८) आहे.


प्रभाग १५४


महादेव शिगवण (भाजप), शेखर चव्हाण (उबाठा), मुरलीकुमार पिल्ले (काँग्रेस)


प्रभाग १५१


सोनिया थोरात (उबाठा), वंदना साबळे (राष्ट्रवादी अजित पवार गट), संगिता भालेराव (काँग्रेस)


प्रभाग १५३


तन्वी तुषार काते (शिवसेना), मीनाक्षी अनिल पाटणकर (उबाठा)


वडाळा विधानसभा : वडाळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांचे वर्चस्व असल्याने महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. मराठी मतदारांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. उबाठा आणि मनसे युती झाली असली तरी वडाळा सहकार येथील प्रभाग १७८ या प्रभागातील जागा युतीअंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडण्यात आली आहे. येथे उबाठाच्या इच्छुक उमेदवार माधुरी मांजरेकर यांना तिकीट न मिळाल्याने स्थानिक पातळीवर नाराजी आहे.


प्रमुख लढती


प्रभाग १७७


कल्पेश कोठारी (भाजप), नेहल शाह (अपक्ष भाजप बंडखोर)


प्रभाग १८१


अनिल कदम (उबाठा), पुष्पा कोळी (शिवसेना)


प्रभाग १७८


अमेय घोले (शिवसेना ), बजरंग सोनावणे (मनसे), रघुनाथ थवई (काँग्रेस)


प्रभाग २००


सुरेश काळे (काँग्रेस), उर्मिला पांचाळ (उबाठा), संदिप पानसंडे (भाजप)


मानखुर्द अणुशक्तीनगर विधानसभा : या विधानसभा मतदारसंघात भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र , न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अणुशक्ती शिक्षण संस्थेची प्रमुख कार्यालये व वसाहती आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सना मलिक या येथून निवडून आल्या आहेत.


प्रमुख लढती


प्रभाग १४३


रचना गवस राष्ट्रवादी (अजित पवार गट), प्राजंल राणे (मनसे), शोभा जायभाये (शिवसेना)


प्रभाग १४६


समृध्दी गणेश काते (शिवसेना), राजेश पुरभे (मनसे), भाग्यश्री केदारे राष्ट्रवादी (अजित पवार गट)


प्रभाग १४७


अनुपमा केदारे (काँग्रेस), अंकिता दवे,राष्ट्रवादी (अजित पवार गट), जयश्री शिंदे (उबाठा)


प्रभाग १४८


सोमू चंदू पवार राष्ट्रवादी (अजित पवार गट), राजेंद्र माहुलकर (काँग्रेस), प्रमोद शिंदे (उबाठा)


धारावी विधानसभा मतदारसंघ : आशियातील सर्वात मोठी झोपडपटटीत सर्वधर्म सर्व प्रातांतील लोकांचे वास्तव्य आहे. धारावीला लेदर आणि गारमेंट उद्योगाचे केंद्र आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा निवडणुकीतील सर्वात कळीचा मुद्दा ठरला आहे. धारावीचा पुर्नविकास धोरण महायुतीच्या सरकारच्यामाध्यमातून राबविण्यात येत असल्याने महायुतीचे उमेदवार पुनर्विकासाच्या नावावर मते मागत आहे, तर उबाठा, काँग्रेससह विरोधी पक्षातील उमेदवार प्रकल्पातील त्रुटींवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे. तसेच, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था,अरुंद गल्ल्यांचे कॉंक्रिटीकरण आणि पिण्याच्या पाण्याची समस्या या मतदारसंघात आहेत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी राजा हे प्रभाग क्रमांक १८५ मधून नशिब अजमावत आहेत.


प्रमुख लढती


प्रभाग १८३


पारूबाई कटके(मनसे), आशा दीपक काळे (काँग्रेस)


प्रभाग १८६


अर्चना शिंदे (उबाठा), सदिच्छा शिंदे (काँग्रेस)


प्रभाग १८५


रवी राजा (भाजप), टी.एम, जगदीश (उबाठा), कमलेश चित्रोडा (काँग्रेस)

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींना धक्का; केवायसी न केलेल्या आणि नियमांचे उल्लंघन केलेल्या महिला योजनेतून बाद

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'

Santosh Nalawade : वापरा आणि फेकून द्या...मनसेच्या शिवडी अध्यक्षांनी का दिला राजीनामा? ५ मोठी कारणं आली समोर

मनसेच्या वटवृक्षाला नेत्यांनीच टोचलं विषारी इंजेक्शन? मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात

खुशखबर! लोकल आणि मेल एक्सप्रेससाठी मिळणार स्वतंत्र मार्ग; मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून आदेश जारी...

मुंबई : मुंबईतील रेल्वेचे जाळे हे वेगानं वाढत चाललं आहेत. त्यामुळे अनेक शहरे मुंबईला जोडली जात आहे. मुंबई

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण