मोहित सोमण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील टॅरिफवर युएस न्यायालय निर्णय देणार आहे तरी त्याचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही असे विधान ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे यांनी केले आहे. खरं तर गुंतवणूकदारांसाठी आजची रात्र वैराची असणार आहे. आज रात्री युएस फेडरल न्यायालय डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफ शुल्काविरोधी याचिकेवर महत्वाचा निर्णय देणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरु केलेल्या अतिरिक्त शुल्क लावल्याने युएसमधीलच डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटरनी न्यायालयात धाव घेतली होती. जर निकाल सकारात्मक आला तर भारतीय शेअर बाजारात अभूतपूर्व रॅलीवर पोहोचण्याची शक्यता आहे असे जाणकार सांगत आहेत जर हा निकाल नकारात्मक लागला अथवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने लागल्यास शेअर बाजारात 'हडकंप' होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह इतर ५० देशांवर आयईईपीए (International Emergency Ecnomic Powers Act IEEPA) या कायद्याअंतर्गत लादले होते. परंतु ही सुनावणी दीर्घकालीन लांबणीवर पडली असली तरी ऑक्टोबर महिन्यात या अतिरिक्त शुल्काला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. आता या प्रकरणात मोठा आदेश लागू शकणार असून भारतीय वेळेनुसार रात्री ११ ते १ दरम्यान हा निर्णय अपेक्षित आहे.
या निर्णयाचा पार्श्वभूमीवर शेअर बाजार सोमवारी कशी प्रतिक्रिया नोंदवेल हे पाहणे क्रमप्राप्त आहे. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सोशल मिडियावर प्रतिक्रिया नोंदवत भारतावर ५००% टॅरिफ लावण्यासाठी ट्रम्प यांनी ग्रीन सिग्नल दिला असून या विधेयकाला परवानगी मिळू शकते असा गौप्यस्फोट केला होता. ज्याचा परिणाम भारतासह जगभरातील शेअर बाजारात दिसला. रशियन तेल खरेदी करण्याविरोधात भारत, चीन, ब्राझील या देशावर ही कार्यवाही करणार असल्याचे लिंडसे ग्रॅहम म्हणाले होते. यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'अध्यक्ष ट्रम्प यांनी मंजूर केलेल्या रशिया निर्बंध कायद्यातील तरतुदींनुसार भारतावर सुमारे ५००% शुल्क लावण्याच्या शक्यतेमुळे काल झालेल्या तीव्र घसरणीनंतर, बाजाराचे लक्ष आज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून ट्रम्प यांच्या शुल्कांच्या कायदेशीरपणावर अपेक्षित असलेल्या निकालावर असेल'. तरीही अजित भिडे यांनी शेअर बाजारात सकारात्मकताच दर्शविली आहे.
असे असताना शेअर बाजारात सोमवारी मोठ्या प्रमाणात संवेदनशील होऊ शकतो पण प्रत्यक्षात तशीच परिस्थिती असेल का व त्याचा गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल यावर 'प्रहार' ने ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे यांना विचारले असता त्यांनी ' वाढ झाली तरी उत्तम पण बाजार कोसळले तरी त्याचा गुंतवणूकदारांवर कुठलाही परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले 'भारतातील हा मंदीचा पॅटर्न हा भूराजकीय अस्थिरतेसह युएस भारत यांच्यातील द्विपक्षीय करारातील अनिश्चिततेमुळे कायम राहिला. परवाची बाजारातील प्रतिक्रिया या निकषावर अवलंबून असली तरी प्रत्यक्षात ट्रम्प यांच्या बाजूने निकाल लागला तरी ते उलटे भारतासाठी उत्तमच आहे. सातत्याने कमी कमी होत असलेला बुलिश पॅटर्न बाजारातुन एकदाचा संपून पुन्हा प्राईज करेक्शन होत बाजार मोठ्या संख्येने उसळेल. प्रत्यक्षात १००० पूर्णांकाने किंवा त्याहून अधिक बाजार पडल्यास गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात कुठलेही नुकसान होणार नाही. कारण झालेली प्राईज करेक्शन सर्वाधिक प्रमाणात मिडकॅप मध्ये दिसू शकते. अस्थिरतेच्या काळात सर्वाधिक सेलिंग मिडकॅप मध्ये झाली असली तरी निर्देशांकामुळे जाणवली गेली नाही. त्या तुलनेत लार्जकॅपमध्ये कमी करेक्शन झाले आहे. निश्चितच जितक्या खाली बाजार जाईल तरी ते तितकेच रिबाऊंड (वाढू) होऊ शकते. त्यामुळे हा निकाल ट्रम्प यांच्या बाजूने लागला तर उलट फायदाच होईल असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान गुंतवणूकदारांसाठी काय रणनीती फायदेशीर ठरू शकते असे विचारले असता, गुंतवणूकदारांनी आपले लक्ष सरकारात्मकेतकडे लक्ष केंद्रित करावे. खरं तर बाजार सध्या कंसोलिडेशन (एकत्रीकरणात) फेजमध्ये आहे. कारण २०२२ ते २०२४ मध्ये शेअर बाजारात मोठी तेजी दिसली होती. वास्तविकता २०२४ पासून सुरूवातीला बाजारात काहीशा मंदीची फेज सुरु झाली. ट्रम्प यांच्या सॅक्शननंतर घसरणीचा कौल बाजारात दिसला. मात्र पुन्हा बाजारात कंसोलिडेशन जाऊन पूर्ववत होत आहे.
प्रत्यक्षात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना काय हातखंडे वापरावे यावर भाष्य करताना अजित भिडे म्हणाले की,' आपले लक्ष विचलित होऊ न देता वेट अँड वॉचचा पवित्रा घ्यावा. त्यामुळे चांगल्या फेजसाठी वाट पहावी. गुंतवणूकदारांनी घाई न करता बुलिश पॅटर्नची वाट पहावी. जर अपवाद म्हणून काही आकर्षक मूल्यांकनाने घसरलेले महागडे शेअर घेऊन 'बाय ऑन डिप्स' (कमी रूपयात खरेदी करून अधिक किंमतीला विक्री) करण्यास हरकत नाही. परंतु अन्यथा संयमाने वाट पाहिल्यास त्याचा लाभ भविष्यात गुंतवणूकदारांना होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांनी विचार करावा. त्यामुळे आतापासूनच गुंतवणूकदारांनी पॅनिक होण्याची गरज नाही. बाजार चांगल्याच स्थितीत आहे. त्यामुळे जर काही ट्रम्प यांच्या बाजूने निकाल लागला तरी त्याचा खूप मोठा ना भूतो ना भविष्यती असा काही परिणाम होणार नाही कारण एप्रिल महिन्यापासून याचा जितका परिणाम झाला तो आता पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे बाजारातील चढउतारीवर आपल्या गुंतवणूकीची विमासा करू नका. भविष्यात लार्जकॅपसह खासकरून मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये विशेषतः जे नुकतेच सूचीबद्ध झाले आहेत अशा शेअरला येत्या काही काळात फायदा होईल असे दिसते. त्यामुळे लक्ष विचलित न करता आपले लक्ष दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर करावे' असे अंतिमतः जेष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत.
व्यतिरिक्त इतर बाजारातील विश्लेषकामध्येही सकारात्मक चित्र दिसते. कारण या निकालाचा परिणाम भारतीय बाजारात काय होईल यावर आपले मत मांडताना विजयाकुमार पुढे म्हणाले आहेत की,'ट्रम्प यांच्या विरोधात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. पण तपशील महत्त्वाचे आहेत. म्हणजेच शुल्क अंशतः रद्द केले जाईल की ते पूर्णपणे बेकायदेशीर घोषित केले जाईल. बाजाराची प्रतिक्रिया या तपशिलांवर अवलंबून असेल. जर सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी लावलेली शुल्कं बेकायदेशीर ठरवली, तर भारतात तेजी येईल, कारण ५०% शुल्कांमुळे भारताला सर्वाधिक फटका बसला आहे.'