पनवेल महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून महिलांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळत असून ५० टक्के आरक्षण असल्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून तब्बल १०८ महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. सर्वाधिक महिला उमेदवारांना भाजपने संधी दिली असून, त्यापाठोपाठ शेतकरी कामगार पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा क्रमांक लागतो. या महिला उमेदवारांपैकी कोण ‘संधीचे सोने’ करणार, हे चित्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.


महापालिका निवडणुकीसाठी पुरुष उमेदवारांप्रमाणेच महिला उमेदवारांनीही गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आपल्या प्रभागांमध्ये जोरदार तयारी केली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच पशुधन यांच्यासाठी सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, छोटेखानी सभा, मेळावे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यावर भर दिला.प्रभागातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, मुलांच्या शाळांमधील प्रवेश, नोकरीच्या संधी, तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे या माध्यमातून अनेक महिला इच्छुकांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये महिला उमेदवारांचे मजबूत नेटवर्क तयार झाले होते.


दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महिला उमेदवारांसह त्यांचे पती, वडील, भाऊ व कुटुंबीय यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.


‘लाडक्या बहिणींपैकी’ कोण मतदारांचा विश्वास संपादन करून विजयी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला

Nashik Simhastha Kumbh Mela : गणेशोत्सव २०२६ ठरणार महासिंहस्थ जनजागृतीचे व्यासपीठ, कुंभमेळा प्राधिकरणाकडून ‘गणेश मंडळ स्पर्धेचा' प्रस्ताव

Nashik Simhastha KumbhMela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची तयारी वेग घेत असताना, गणेशोत्सवाच्या माध्यमातून महासिंहस्थचा संदेश

Healthy Sweet Dish : सणासुदीला गोड खा, पण वजन वाढण्याची चिंता नको! ‘हे’ हेल्दी स्वीट्स नक्की ट्राय करा

मुंबई : सणासुदीचे दिवस म्हटले की घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू होते. लाडू, बर्फी, श्रीखंड, मोदक अशा पदार्थांवर