खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून आल्याने गुरुवारी पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे.


मोरबे धरणातून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या २०५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत ही गळती आढळल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या बिघाडाचा परिणाम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह सिडकोच्या खारघर व कामोठे परिसरावर होणार असून, आज सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.


महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ जलवाहिनीत तांत्रिक बिघाड लक्षात येताच दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीसाठी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.


उद्या सकाळपासून पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार सुरळीत करण्यात येईल, असा अंदाज महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. अनपेक्षित तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त शहर अभियंत्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८