Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड दिशेने जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे हा अपघात झाला. ही घटना आज दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास घडली.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात अंदाजे ११ ते १२ चारचाकी तसेच तीनचाकी वाहनांनी एकमेकांना धडक दिली. अचानक झालेल्या या साखळी अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.


या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. जखमींमध्ये ऑटो रिक्षा चालक शिवकुमार बेचू प्रसाद यादव (वय ५६), ओला कार चालक रामबली बाबुलाल (वय २२), रिक्षातील प्रवासी अनिता दिनेश पेटवाल (वय ४५) आणि तस्किर शफिक अहमद शेख (वय ४५) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने वाघबीळ येथील टायटन मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोणाच्याही जखमा गंभीर नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले असून ते हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत.


अपघातग्रस्त वाहनांमधील इतर नागरिक परस्पर निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक संथ झाली होती, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. घोडबंदर रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे आणि विशेषतः घाट परिसरात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या

धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच,

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण

धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली