पश्चिम बंगालमध्ये रणकंदन! ईडी अधिकाऱ्यांचा मोबाईल खेचून ममता दीदींची गुंडागर्दी का ईडीची चूकभूल? वाद शिगेला...

मुंबई: बंगालमधील रणकंदन शिगेला गेले आहे. अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate ED) आयपॅक (Indian Political Action Committee IPAC) वर घातलेल्या धाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण चिघळले आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यलयात ईडी अधिकाऱ्यांनी घेराव घातल्यानंतर स्वतः ममता बॅनर्जी तिकडे पोहोचल्या व सुत्रांच्या माहितीनुसार,त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांच्या हातातील मोबाईल खेचून घेतल्याने तेथे हाय वोल्टेज ड्रामा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले आहे.


ईडीने अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत सरकारविरोधात न्यायालयात धाव घेतली असताना ममता बॅनर्जी यांनी विविध ठिकाणी ईडी विरोधात तीन एफआयआर (First Hand Information Report FIR) दाखल केले आहेत. त्या कथित प्रकरणात बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाच्या संवेदनशील माहितीची चोरी केल्याचा आरोप ईडीवर केला आहे. तसेच ईडीकडूनही बंगाल सरकारवर चौकशीत बाधा आणल्याचा आरोप केला गेला होता.


या प्रकरणी ईडीने दिलेल्या माहितीनुसार,तपास सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांची सुरक्षा यंत्रणा तिथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. याशिवाय सरकारकडून कोणतीही कारवाई न करता उलट ईडीवर दबावतंत्राचा वापर केला गेला असा आरोप ईडीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केल्याचा आरोपही प्रत्यक्षदर्शी ईडी अधिकाऱ्यांनी केला आहे.


संबंधित प्रकरण न्यायालयात गेले असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडीवर आरोपांची फैरी झाडून विविध आरोप केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी ईडीवर ट्रेसपासिंग (विना परवानगी प्रवेश निषिद्ध क्षेत्रात घुसखोरी),संवेदनशील माहिती डेटा चोरी करणे व पुरावे नष्ट करणे असे गंभीर आरोप केले आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले असताना हे न्यायप्रविष्ट प्रकरण झाले आहे. आजची सुनावणी पुढे ढकलत आता १४ जानेवारीला पुढील सुनावणी अपेक्षित आहे. यापूर्वीही ममता बॅनर्जी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. या निमित्ताने ममता दीदींचे विरोधक ममता दीदींची गुंडागर्दी म्हणून दीदीवर आरोप करत आहेत. तर ममता दीदीही ईडीवर गंभीर आरोप करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.

कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका