'गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा'

शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी

पेडणेकरांच्या उमेदवारीविरोधात कायदेशीर लढाईचे संकेत


मुंबई : कोविड काळात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या उबाठाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केली आहे. पेडणेकर यांनी उमेदवारी अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवली असून त्याविरोधात कायदेशीर लढाईचे संकेत आमदार राणे यांनी दिले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


आमदार राणे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १९९ मधील उबाठा उमेदवार किशोरी पेडणेकर यांच्यावर २०२३ मध्ये दोन फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या आता जामिनावर बाहेर आहेत. मात्र पेडणेकर यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्जात ही माहिती लपवली आहे. आरपीए १२५ ए कायद्यानुसार एखाद्या उमेदवाराने माहिती लपवली असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संबधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येते. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द व्हायला हवी, असे आमदार राणे म्हणाले.


पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना धमकी देऊन त्यांनी उमेदवारी मिळवली, असे आमदार राणे म्हणाले. कोविडमधील सगळं बाहेर काढेन, असे ठाकरेंना सांगून ब्लॅकमेल केलं आणि तिकिट मिळवलं, असे आमदार राणे म्हणाले. एक गुन्हा बॉडीबॅग घोटाळ्याचा आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेने १६०० रुपये किमतीची बॉडीबॅग ६७१९ रुपयांना खरेदी केली. इन्फोटेक कंपनीकडून हजारो बॉडीबॅगची खरेदी केली आणि यातून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप आमदार राणे यांनी केला. दुसरा गुन्हा एसआरए प्रकल्पासंदर्भात झालेला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल असलेली व्यक्ती महापालिकेत निवडून गेल्यावर सेवा करेल की लुटमार करेल याचा वरळीकर मतदारांनी विचार करायला हवा, असे आवाहन आमदार राणे यांनी केले. पेडणेकर यांनी माणसुकी ठेवून निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडावं. या प्रकरणी पेडणेकर शंभर टक्के अपात्र ठरतील. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे आमदार राणे म्हणाले.



ठाकरेंनी मुंबईच्या विकासावर बोलावं


मुंबईच्या विकासावर बोलण्याऐवजी मुंबईला आणि महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे मुद्दे मांडत आहेत, अशी टीका आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर केली. ठाकरे मुंबईत इतकी वर्ष सत्तेत असताना कोणती विकास कामं केली ही त्यांनी सांगावीत, असे आमदार राणे म्हणाले. राज ठाकरेंकडून चांगल्या विषयाची अपेक्षा होती, मात्र त्यांचे विचार पाहून ती फोल ठरली. लंडनला जाताना ठाकरेंना गुजराती माणूस कसा चालतो, असा सवाल आमदार राणे यांनी केला. मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न तुमची घरं चालवण्यासाठी करत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाशेजारी आदित्य आणि अमित ठाकरेंनी चॅनलला मुलाखत दिली. त्यांनी तेथील पावित्र्य भंग केलं, असे आमदार राणे म्हणाले.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम