कल्याणमध्ये उबाठाला मोठा झटका

अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश


कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच उबाठा गटाला कल्याणमध्ये मोठा धक्का बसला आहे. मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवाराने अचानक माघार घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत थेट पक्षप्रवेश केला आहे.


रामचंद्र माने असे या उमेदवाराचे नाव असून, त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. माने हे केवळ पाठिंबा देऊन थांबले नसून त्यांनी प्रत्यक्ष शिंदे गटात प्रवेश केल्याने उबाठा गटाला हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक ३० (ड) मधून शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन पाटील निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून रामचंद्र माने उमेदवार होते. मात्र, मतदानास अवघे आठ दिवस शिल्लक असताना माने यांनी माघार घेतल्यामुळे आता पाटील यांच्याविरोधात एकही उमेदवार उरलेला नाही.


शिंदे गटाचे सात नगरसेवक बिनविरोध


या घडामोडीनंतर अर्जुन पाटील यांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक सात झाले आहेत. याआधी महायुतीतील तब्बल २० नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, माने यांच्या प्रवेशामुळे महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. दरम्यान, भाजपचेही १४ नगरसेवक बिनविरोध विजयी झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीचे संख्याबळ निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम