घातक बेबी फूडवर नेस्ले इंडियाचे महत्वाचे विधान कंपनी म्हणते ही उत्पादने आम्ही भारतात....

प्रतिनिधी: नेस्ले कंपनीच्या उत्पादनात लहान मुलांसाठी घातक घटक पदार्थ असल्याची चौफेर टीका झाल्यानंतर भारतात ही उत्पादने विकली गेलीच नसल्याचा दावा नेस्ले इंडिया (Nestle India) कंपनीकडून करण्यात आला आहे. बाळाच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या सेरेलुईड टॉक्सॉइड (Cereulide Toxin) असलेल्या घटकांचा समावेश नव्या विकल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांच्या बॅचमध्ये नसल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आपल्या निवेदनात नेस्ले इंडियाने म्हटले आहे की, त्यांनी देशात अलीकडे परत मागवलेल्या उत्पादनांपैकी कोणतेही उत्पादन विकलेले किंवा आयात केलेले नाही. कंपनीने पुढे सांगितले की, भारतात विकले जाणारे सर्व शिशु फॉर्म्युला ब्रँड्स स्थानिक पातळीवर उत्पादित केले जातात.' कंपनीच्या जगभरातील उत्पादनातील घटकांवर टीका झाल्यावर नेस्ले मूळ कंपनीने काही बेबी फॉर्म्युला उत्पादने जागतिक स्तरावर परत मागवल्यानंतर हे विधान आले आहे.


'नेस्ले इंडिया परत मागवलेल्या किंवा मागे घेतलेल्या उत्पादनांपैकी किंवा बॅचपैकी कोणतेही उत्पादन आयात करत नाही किंवा विकत नाही' असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.'भारतात विकले जाणारे सर्व शिशु फॉर्म्युला ब्रँड्स स्थानिक पातळीवर उत्पादित केले जातात. आम्ही या उत्पादनांवर सखोल चाचणी केली आहे आणि आम्ही याची पुष्टी करतो की ती सर्व FSSAI आणि लागू नियम व नियमांचे पालन करतात' असेही नेस्ले इंडियाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे.


यापुढे आपल्या निवेदनात,'आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमची सर्व उत्पादने FSSAI आणि लागू नियम व नियमांचे पूर्णपणे पालन करतात. एका प्रमुख पुरवठादाराने पुरवलेल्या घटकामध्ये गुणवत्तेची समस्या आढळल्यानंतर, नेस्लेने युरोपमध्ये उत्पादित केलेल्या काही शिशु फॉर्म्युला उत्पादनांच्या बॅचसाठी काही देशांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून उत्पादन परत मागवणे/मागे घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत संबंधित उत्पादनांमुळे कोणत्याही आजाराची पुष्टी झालेली नाही' असेही त्यात म्हटले आहे.


यापूर्वीही २०२३ मध्ये कंपनीच्या बेबी फूडवर तज्ञांनी टीका केली होती. त्यानंतर यासंबंधीची भारताच्या अन्न सुरक्षा नियामक मंडळ एफ एसएसएआय (FISAAI) ने चौकशी केली होती. त्यामुळेच जानेवारी २०२६ मध्ये स्विस पॅकेज्ड फूड कंपनीने मंगळवारी काही बेबी फॉर्म्युला उत्पादने परत मागवली होती. बाळाच्या अन्नात एक विषारी पदार्थ असू शकतो ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली जात असल्याने कंपनीनेही तपासणीसाठी जुन्या बँचची उत्पादने परत मागवली होती.जागतिक कंपनीने म्हटले आहे की, 'एका प्रमुख पुरवठादार (Suppplier) पुरवलेल्या घटकामध्ये गुणवत्तेची समस्या आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.'


विशेषतः जानेवारी २०२६ मध्ये विषाच्या जोखमीवर (सेरुलाइड) बेबी फॉर्म्युला मुद्दा आणि २०१५ च्या मॅगी नूडल्स लीड प्रमाण भयावतेसारखे भूतकाळातील वाद यासारख्या प्रमुख बाबींबद्दल अन्न नियामकाकडून कंपनीच्या उत्पन्नाची चौकशी केली असताना नेस्ले अनेकदा रिकॉलवर सहकार्य करते असे कंपनीने म्हटले होते.अनेकदा कंपनीने अशा निकालावर न्यायालयात नियामक कृतींना आव्हान दिले आहे. कंपनीचा मते,ते त्यांच्या स्वतःच्या कठोर नियंत्रणांवर भर देतात तर अधिकारी सार्वजनिक संरक्षण आणि अनुपालनावर लक्ष केंद्रित करतात.आता मध्यपूर्वेतील ईडीई (Emirates Drug Establishment EDE) नियामकांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नेस्लेने आपल्या जुन्या उत्पादने परत मागवत त्याची चिकित्सा सुरू केली आहे.

Comments
Add Comment

जेएसडब्लू स्टील तिमाही उत्पादन आकडेवारीनंतर शेअर्समध्ये १% वाढ

मोहित सोमण: जेएसडब्लू स्टील (JSW Steel Limited) कंपनीच्या तिमाही निकालातीव उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली आहे. यानंतर

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

शेअर बाजारात सलग नवव्या सत्रात घसरण अस्थिरतेचे भय बाजारात सुरुच! सेन्सेक्स १०३.२४ व निफ्टी ४५.४० अंकांने कोसळला

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत आजही शेअर बाजारात घसरणच सुरु आहे. सलग नवव्या सत्रात झाल्याने इक्विटी बेंचमार्क

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा

बंडखोरी, नाराजीचा प्रस्थापितांना फटका

हवा दक्षिण मुंबईची महेश पांचाळ :  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा परिसर हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा

पनवेल महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून महिलांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळत असून ५० टक्के आरक्षण