अर्थविश्वात खळबळ!आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीतील १८० अब्ज डॉलरच्या 'इनसायडर ट्रेडिंग' प्रकरणी बँक ऑफ अमेरिका सेबीच्या रडारवर!

प्रतिनिधी: सेबीने बोफा (Bank of America BoFA) बँकेला बेकायदेशीर कृतीसाठी जबाबदार धरल्याने अर्थविश्वात खळबळ उडाली आहे. बँक ऑफ अमेरिका (Bank of America) बँकेने कथित प्रकरणात आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी (Aditya Birla Sun Life Aseet Management Company AMC) कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२४ मधील १८० दशलक्ष डॉलर्सची विक्री प्रकरणात इनसायडर ट्रेडिंगचा ठपका बँकेवर ठेवला आहे. बँकेने आपली जबाबदारी पार न पाडल्याने बँकेतील कर्मचारी अथवा काही अधिकाऱ्यांकडून संवेदनशील माहिती काही गुंतवणूकदारांना देण्यात आली असा ठपका सेबीने ठेवला आहे. त्यामुळे या कथित प्रकरणात बँकेने आपली जबाबदारी नीट न पार पाडल्याने या ट्रेडिंगचा सौदेबाजीतील नफेखोरीवर परिणाम झाल्याचा गंभीर इशारा सेबीने बँकेला दिला. या कथित प्रकरणात सेबीने बँकेला कारणे दाखवा नोटीस दिली असल्याची माहिती पुढे येत आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बँकेने बेजबाबदारपणे हे प्रकरण हाताळल्याचे सेबीने म्हणत या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.


या प्रकरणातील घडामोडीवर अद्याप सेबी अथवा बँक ऑफ अमेरिकेने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र बँकेच्या अधिकृत प्रवक्त्याने २०२४ मध्ये हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ अमेरिका सेबीच्या आरोपांना उत्तर देण्याची तयारी करत आहे आणि कोणताही गैरप्रकार मान्य न करता किंवा नाकारता अनेक दशलक्ष डॉलर्सच्या समझोत्याची मागणी करण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे.


घोषणांपूर्वी सार्वजनिक नसलेली माहिती सामायिक करणे हे भारतात आणि इतर अनेक बाजारपेठांमध्ये बेकायदेशीर आहे कारण अशा माहितीशी संबंधित विशेष व्यक्ती अपेक्षित किमतीतील बदलांमधून नफा कमवू शकतात. बँकेने सेबीला दिलेल्या आपल्या पूर्वीच्या माहितीत सुधारणा केली आणि नॉन-डील टीममधील कर्मचारी व गुंतवणूकदार यांच्यातील संवादाची नोंद दर्शवणारी कागदपत्रे सादर केली, असे सुत्रांनी दिलेल्या अहवालात नमूदही करण्यात आले आहे. संबंधित माहिती सेबीला २०२४ मध्ये 'व्हिसलब्लोअर' ने दिली होती असे सांगितले जाते.


बँक ऑफ अमेरिका आणि सेबीने या अहवालावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी २०२४ मध्ये माहितीच्या गळतीचा आरोप करणारी एका व्हिसलब्लोअरची तक्रार प्रसिद्ध केली होती परंतु बँकेच्या प्रवक्त्याने त्यावेळी हे आरोप फेटाळून लावले होते आणि या दाव्यांना दुजोरा देणारा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे म्हटले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 'फेमा'च्या कलमांनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून बँक ऑफ अमेरिकावर दंड लावला होता. या फेमा (Foreign (Exchange Management Act FEMA 1999) योजनेअंतर्गत अहवाल सादर करण्याच्या आवश्यकतांसंबंधीच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल बँक ऑफ अमेरिकावर दंड आकारण्यात आला होता. सप्टेंबरमध्ये सेबीने स्वान एलएनजीचे सीईओ आणि स्वान कॉर्प (पूर्वीची स्वान एनर्जी लिमिटेड) चे नियुक्त व्यक्ती राहुल शर्मा यांच्यावर इनसाइडर ट्रेडिंगच्या उल्लंघनासाठी २ लाख रुपयांचा दंड लावला होता. सेबीच्या तपासात असे आढळून आले की, शर्मा यांनी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान स्वान कॉर्पच्या शेअर्समध्ये व्यवहार आणि प्रति-व्यवहार केले, ज्यामुळे त्यांनी ३०.२५ लाख रुपयांचा बेकायदेशीर नफा कमावला. त्यामुळे आता सेबीला बँक ऑफ अमेरिका काय उत्तर देते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

जेएसडब्लू स्टील तिमाही उत्पादन आकडेवारीनंतर शेअर्समध्ये १% वाढ

मोहित सोमण: जेएसडब्लू स्टील (JSW Steel Limited) कंपनीच्या तिमाही निकालातीव उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली आहे. यानंतर

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

शेअर बाजारात सलग नवव्या सत्रात घसरण अस्थिरतेचे भय बाजारात सुरुच! सेन्सेक्स १०३.२४ व निफ्टी ४५.४० अंकांने कोसळला

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत आजही शेअर बाजारात घसरणच सुरु आहे. सलग नवव्या सत्रात झाल्याने इक्विटी बेंचमार्क

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा

बंडखोरी, नाराजीचा प्रस्थापितांना फटका

हवा दक्षिण मुंबईची महेश पांचाळ :  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा परिसर हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा

पनवेल महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून महिलांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळत असून ५० टक्के आरक्षण