१ फेब्रुवारी रोजी रविवार आल्याने अर्थसंकल्प कधी ?

२८ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी १ फेब्रुवारीला सादर केला जातो. यावेळी १ फेब्रुवारीला रविवार आला आहे. त्यामुळे या दिवशी अर्थसंकल्प सादर होणार की नाही याबाबत चर्चांना ऊत आला आहे. १ फेब्रुवारी आणि अर्थसंकल्पाचे सादरीकरण हे समीकरण कायम राखण्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण या रविवारी १ फेब्रुवारी २०२६ लाच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.


संसदीय कार्य समितीच्या (सीसीपीए) बुधवारी होणाऱ्या बैठकीत अर्थ संकल्पाच्या संसदीय सत्राच्या तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘ सीसीपीए’च्या बैठकीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि या वर्षी कोणत्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल या दोन्हींची तारीख निश्चित केली जाईल. १ फेब्रुवारीला रविवार आल्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी रोजी सुरू होईल. हे सत्र राष्ट्रपतींच्या संबोधनानंतर सुरू होऊ शकते. आर्थिक सर्वेक्षण २९ जानेवारी रोजी पटलावर ठेवले जाईल. त्यानंतर ३० आणि ३१ जानेवारी रोजी सुट्टी असेल. समितीने मंजुरी दिली, तर १ फेब्रुवारी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल.


भारतात २०१७ सालापासून अर्थसंकल्प दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सादर करण्याची परंपरा आहे. मात्र, २०२६ मध्ये १ फेब्रुवारी रोजी रविवार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ ची तयारी आधीपासूनच सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या आधी चर्चेसाठी ९ ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर या दरम्यान बैठका झाल्या होत्या. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाचा अंदाज आणि २०२५-२६ अर्थसंकल्पातील संशोधन यांना अंतिम स्वरूप देण्यात आलं होतं. अर्थ मंत्रालय केंद्रीय सांखिकी कार्यालयाकडून जीडीपी अंदाज देखील मिळवण्याची प्रक्रिया यात समाविष्ट आहे. याचा उपयोग अर्थसंकल्पाच्या शेवटच्या गणनेवेळी केला जाईल. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी त्यावेळी अर्थमंत्री म्हणून दोन कार्यकाळात मिळून १० अर्थसंकल्प सादर केले. त्यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.


रविवारी देखील शेअर बाजार उघडणार? : जर १ फेब्रुवारी रविवारी अर्थसंकल्प सादर केला गेला तर त्या दिवशी शेअर बाजार खुला राहण्याची शक्यता आहे. या दिवशी तुम्ही ट्रेडिंग देखील करू शकाल. याचबरोबर शेअर खरेदी-विक्री देखील होण्याची शक्यता आहे. मात्र अजून तरी एक्सचेंजकडून १ फेब्रुवारीला शेअर मार्केट खुले राहणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम