टायटन्सने जबरदस्त तिमाही निकाल नोंदवल्यानंतर शेअर दे दणादण!

मोहित सोमण: टाटा एंटरप्राईजेस समुहाची फ्लॅगशिप कंपनी टायटन (Titan) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच शेअर ४% पेक्षा अधिक पातळीवर उसळला होता. आज दुपारी १२.४४ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी ४.५१% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर ४.५१% उसळला असून ४२९७.१० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. कंपनीने आपल्या तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. यातील माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४०% वाढ महसूलात नोंदवली आहे. विविध व्यवसायांची वर्गवारी केल्यास घरगुती व्यवसायात (Domestic Business) मध्ये ज्वेलरीत ३८%, तनिष्क मिया, झोया, बीयोन या व्यवसायांत ४०%, कार्टलेन ४२%, घड्याळे १३%, आय केअर १६%, इमर्जिंग बिझनेस १४% वाढ झाली आहे. तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण स्टोअर्समध्ये अथवा दालनात ज्वेलरीत ५४, तनिष्क २३, कार्टलेन २४, घड्याळ २२, आयकेअर १७, इमर्जिंग बिझनेस दालनात २ दालनाने वाढ झाली आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूणच वाढलेल्या मागणीमुळे, तसेच सणाच्या कालावधीत वाढलेल्या वाढीमुळे, तसेच एएसपी (Average Selling Prices ASP) वाढ झाल्याने कंपनीच्या ज्वेलरी व्यवसाय महसूलात अंतिमतः वाढ झाल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. घड्याळाच्या व्यवसायात इयर बेसिसवर १३% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यावेळी या कंपनीने दोन अंकी वाढ नोंदवली असून कंपनीच्या सोनाटा, फास्टट्रॅक या प्रोडक्ट उत्पादनातील विक्रीतील वाढीचा कंपनीला झाला. या कंपनीच्या तिमाही बेसिसवर १७% वाढ इयर ऑन इयर झाली आहे. आयकेअर बाबतीत कंपनीने १६% वाढ एकूण घरगुती व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढलेल्या प्रोडक्ट लाईन मुळे झाली असल्याचे म्हटले. तर उदयोन्मुख बाजारपेठेत (Emerging Business) मध्ये कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर २२% वाढ नोंदवली आहे. दरम्यान कंपनीच्याच तनीरा (Taneria) बाबतीत विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर ६% घसरण झाली आहे. त्यामुळे एकूणच आकडेवारीवर यांचा काही परिणाम झाल्याचे कंपनीने नमूद केले होते. आंतरराष्ट्रीय ज्वेलरी व्यवसायात (Tanishq, Mia, Cartlane) इयर बेसिसवर तब्बल ८१% वाढ झाली असल्याने अंतिमतः कंपनीने चांगले प्रदर्शन नोंदवले आहे. यामुळेच शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे.


कंपनीने चांगला निकाल नोंदवल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ४ ते ५% वाढ झाली होती. कंपनीच्या शेअरने ४३१२.१० रूपये प्रति शेअर ही इंट्राडे उच्चांक पातळी गाठली होती. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.९२% वाढ झाली असून महिन्यात शेअर्समध्ये १३.९७% वाढ तर संपूर्ण वर्षभरात शेअर्समध्ये २२.४९% वाढ झाली आहे. तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) बेसिसवर शेअर्समध्ये ५.९२% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार.. उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

सातारा निवडणुकीतील राड्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निलंबित करा नीलम गोऱ्हेचें निर्देश

मुंबई : आज विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान साताऱ्यातील एका धक्कादायक घटनेचे तीव्र पडसाद उमटले. सातारा जिल्हा

अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; शिवनिका ट्रस्ट SIT च्या रडारवर

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना आता या प्रकरणाचे धागेदोरे इतर संस्थांकडेही

Pakistan Super League : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेवर दहशतीचे सावट? परदेशी खेळाडूंना तात्काळ माघार घेण्याचा इशारा

गुरुवार २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) ११ व्या हंगामावर दहशतीचे सावट पसरलेले दिसत

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना