निर्माता मंदार देवस्थळीने शशांक केतकर नंतर 'या' अभिनेत्रीनेचेही थकवले ३ लाख

मुंबई : हे मन बावरे, होणार सून मी या घरची यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधला प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर हा नेहमी सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतो. त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील तो ओळखला जातो. सोशल मीडियाद्वारे तो दैनंदीन जीवनातील विविध गोष्टींवर, समस्यांवर आपली मत मांडत असतो.


या अभिनेत्याने नुकतच 'हे मन बावरे' या सीरिअलच्या निर्मात्यावर म्हणेजच मंदार देवस्थळी वर पैसे थकवण्याचे गंभीर आरोप केले होते. हे मन बावरे ही सीरिअल संपून जवळपास ७ वर्ष झाली तरी माझे ५ लाख काही मला मिळाले नाही. मंदारने सतत तारखा दिल्या तसेच पैसे देण्याच्या थापा मारल्या. अशी वक्तव्य करत, याबद्दलचे सर्व पुरावे त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून चाहत्यांसोबत शेअर ही केले होते.


 



 

या अभिनेत्रीचेही थकवले पैसे


शशांक नंतर आणखी एका अभिनेत्रीचे लाख भर रुपये थकवल्याचे आता समोर आले आहे. ती अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री म्हणजे विदिशा म्हसकर , सध्या पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत काम करत असणाऱ्या विदिशानेही शशांकच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की, माझेही टीडी सह जवळपास तीन लाख रुपये बाकी आहेत. त्यावेळी आम्ही बोललो म्हणून आम्हाला ट्रॉल केलं गेलं. चुकीचं ठरवलं गेलं. आपल्या इंडस्ट्री यामध्ये असं चालत असं ऐकवलं गेलं. नंतर ती गोष्ट सोडून आम्ही पुढे गेलो.


पुढे विदिशाने " जॉब बिझनेस आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये कायदे आहते, पण मनोरंजन सृष्टीसाठी एकही नियम कायदा नाही. कामाच्या तासांपासून, सुट्टीपर्यंत, पगारांसाठी कशाचेच नियम नाहीत. मी या विषयासंबंधित खूप वकीलांशी बोलले आहे, पण तेसुद्धा म्हणतात की काही होऊ शकत नाही. मनोरंजन सर्वाना अविरत पाहिजे असत. पण त्यास्तही रोज १४- १४ तास आम करावं लागत. आम्ही तेही आनंदाने करतो; पण आमच्या कामाच्या बदल्यात हेच आम्हाला रोज मिळत. अश्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत. शंशाक आणि विदिशा नंतर आणखी किती कलाकारांचे पैसे बुडवले आहेत हे नक्कीच बाहेर येईल.

Comments
Add Comment

सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग

कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर

बिग बॉस सीझन ६ मध्ये 'या' मराठी कलाकाराची एंट्री;ज्याने अल्लू अर्जुनला दिलाय आवा

Shreyas Talpade : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन ६ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत

अभिनेत्री तेजस्विनी लोणारेनी लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर केले 'हे' खास फोटो

समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांच घर हे खूप सुंदर आहे. घरातील भडकपणा टाळून साधेपणा जपण्यात

धुरंधर पार्ट २ लवकरच होणार रिलीज; अखेर तो दिसणार की नाही?

Dhurandhar 2 Big Entry : धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने तूफान कामगिरी करत केली असून

Katrina Kaif And Vicky Kaushal : "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा किरण..." अखेर समोर आलं ज्युनिअर कौशलचं नाव

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस

Kartik Aaryan: "मिस्ट्री गर्ल करिना म्हणते – मी कार्तिकची गर्लफ्रेंड नाही; फोटो व्हायरल"नक्की काय प्रकरण ?

Kartik Aaryan: बॅालीवुडमधील आपल्या भन्नाट अभिनयामुळे ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन आणि सोनु की टिटु की स्विटी या