व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज भरतानाच १५ हजार डॉलर (भारतीय चलनात साडेतेरा लाख रुपये) बॉण्डसाठी जमा करावे लागतात. याआधी सहा देशांतील नागरिकांना यूएस व्हिसासाठी अर्ज करताना १५ हजार डॉलर जमा करावे लागत होते. आणखी सात देश नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. १३ देशांतील नागरिकांना यूएस व्हिसासाठी अर्ज करण्याआधीच १५ हजार डॉलर जमा करावे लागणार आहेत.
अमेरिकेत होणाऱ्या स्थलांतराला कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने जाहीर केलेल्या यादीनुसार भूतान, बोत्सवाना, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, गिनिआ, गिनिआ बिसाउ, नामिबिया व तुर्कमेनिस्तान या सात देशांतील नागरिकांना यूएस व्हिसासाठी अर्ज करताना १५००० अमेरिकन डॉलर भरावे लागणार आहेत.