उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिल्लीत अनधिकृत मशिदीवर मनपाची कारवाई, दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एमसीडी अर्थात दिल्ली मनपाने तुर्कमान गेट परिसरातील अनधिकृत मशिद आणि इतर बेकायदा बांधकाम पाडले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात मनपाने कारवाई केली. कारवाई सुरू असताना मुसलमानांनी दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बळाचा वापर करुन परिस्थितीवर लगेच नियंत्रण मिळवले.


अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दिल्ली मनपाने दहा बुलडोझर, १५ जेसीबी, ७० डंपर यांचा वापर केला. मनपाच्या कारवाईवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच एक हजार पोलीस जवानांचा बंदोबस्त घटनास्थळी होता. मशिदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आले होते.



दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार


कारवाई सुरू असतानाच स्थानिक लोक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांनी विरोध करत जमावाने बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि गॅस बुलेट्सचा वापर केला. पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले होते.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. ज्यांनी दगडफेक आणि हिंसाचार केला, त्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे केली जाईल. कोणत्याही उपद्रवी व्यक्तीला सोडले जाणार नाही."



न्यायालयाचा आदेश काय होता ?


डिसेंबर महिन्यात एमसीडीने रामलीला मैदानातील अवैध अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक उद्योग थांबवण्याचे आदेश दिले होते. तपासात असे आढळले की, सरकारी जमिनीचा वापर नकाशात नसलेल्या मोठ्या बांधकामासाठी आणि लग्नाचा हॉल याचा वापर खासगी कार्यक्रमांसाठी केला जात होता. दिल्ली उच्च न्यायालयाने मशिदीला लागून असलेला दवाखाना बेकायदा घोषित केला होता.

Comments
Add Comment

योजना केवळ कागदांवर न राहता थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचाव्यात

अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतला विकासाचा आढावा नवी दिल्ली : जरी सध्या देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण