कल्याण ज्वेलर्सच्या तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ४% वाढ

मोहित सोमण: देशातील मोठ्या प्रमाणात ज्वेलरी ब्रँड चेनपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने (Kalyan Jewellers) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सला पहिल्या तिमाहीतील एकूण महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३१% वाढ नोंदवली आहे. तर कंपनीच्या एकूण परदेशी कामकाजातील महसूलात (International Operations) इयर ऑन इयर बेसिसवर ३१% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सच्या मध्यपूर्वेतील व्यवसायात पहिल्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर २६% वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. याशिवाय जागतिक व्यवसायात गेल्या तिमाहीतील तुलनेत १५% एकत्रित महसूल (Consolidated Revenue) वाढला आहे. कल्याण ज्वेलर्सने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात अक्षय तृतीया, इतर सण, व लग्नाच्या हंगाम या कारणामुळे गेल्या तिमाहीत मोठी वाढ झाली आहे.


संपलेल्या तिमाहीत कल्याण ज्वेलर्सने भारतात नवी १० दालने (Showroom) उघडली आहेत. तर युएसमध्ये १ व इतर ठिकाणी ८ दालने उघडली आहेत. मोठ्या प्रमाणात कंपनीची व्हर्टिकल व हॉरिझोंटल वाढ झाल्याने कंपनीच्या महसूलात व विस्तारात वाढ झाली आहे. कंपनीच्या मते, ज्वेलरीचा विक्रीतही वाढ झाली असल्यासह वाढत्या मागणीमुळे कंपनीने आपली वाढ नोंदवली आहे. सध्या कंपनीची भारत व मध्यपूर्वेतील मिळून एकूण ४०५ दालने आहेत.


कंपनीने यापूर्वी कॅन्डेरे नावाचा ब्रँड लाँच केला होता. एकूणच बाजारातील वाढ झाल्यानंतर कल्याण ज्वेलर्सने आपल्या निवेदनात,:आमच्या कॅन्डेरे या डिजिटल-फर्स्ट दागिन्यांच्या प्लॅटफॉर्मने, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, नुकत्याच संपलेल्या तिमाहीत अंदाजे ६७% महसूल वाढ नोंदवली. कॅन्डेरेने मे २०२५ च्या उत्तरार्धात आपली ब्रँड मोहीम सुरू केली. ब्रँड मोहीम सुरू झाल्यानंतरच्या कालावधीत, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत, शोरूममधील ग्राहकांची उपस्थिती, वेब ट्रॅफिक आणि महसूल वाढीमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे आम्ही उत्साहित आहोत.' असे म्हटले आहे.


सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये थेट ४% वाढ झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ३.७३% वड झाल्याने शेअर ५१८.७० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५१६९५ कोटी रुपये आहे. गेल्या एक आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ७.५९% वाढ झाली असून संपूर्ण वर्षभरात मात्र -२७.७७% घसरण झाली आहे. इयर टू डेट (YTD) बेसिसवर ७.७५% वाढ झाली आहे. दिवसभरात कंपनीने ५२०.५५ रूपये प्रति शेअरवर इंट्राडे उच्चांक नोंदवला आहे.

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री!

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारीच सादर होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी,

रविवारी ठाकरे बंधूंची, तर सोमवारी महायुतीची शिवाजी पार्कवर सभा

महापालिकेकडून सभांसाठी अटींचे पालन करण्याचे निर्देश मुंबई : राजकीय पक्षांसाठी शिवाजी पार्कवरील सभांच्या

प्रचार सुरू असतानाच शिवसेना उमेदवारावर हल्ला

वांद्र्यातील घटनेने निवडणुकीत खळबळ मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला

महायुतीचे उमेदवार बिनविरोध आल्याची विरोधकांना पोटदुखी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल कल्याण : विरोधकांना निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नव्हते.

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस