शनिदेवाच्या दर्शनाआधीच काळाने डाव साधला; मिनी बसच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर : इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.


राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर उंबेरे गावाजवळ भरधाव मिनी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात इगतपुरी तालुक्यातील गिरणारे गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, रिक्षातील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात दीपक जगन डावखर (२२), आकाश मनोहर डावखर (२२) आणि दीपक विजय जाधव (२२) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघेही नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील गिरणारे गावचे रहिवासी होते.


दरम्यान, या अपघातात रूपेश गणेश भगत (१९) आणि रोशन गंगाधर डावखरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला?, मिनी बसचा वेग किती होता? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि