अमेरिकेच्या विस्तारवादी भूमिकेला युरोपीय राष्ट्रांचा विरोध

ट्रम्प यांच्या 'धमकी'विरोधात जर्मनी, फ्रान्ससह ७ देश एकवटले


वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा सांगत दिलेल्या धमकीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजली आहे. ट्रम्प यांच्या या विस्तारवादी भूमिकेला आता युरोपीय राष्ट्रांनी कडाडून विरोध दर्शवला असून, फ्रान्स व जर्मनीसह सात प्रमुख देशांनी एकत्र येत अमेरिकेला इशारा दिला आहे. ग्रीनलँडची सुरक्षा ही युरोपची प्राथमिकता असून, त्याच्या भविष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ डेन्मार्क व तिथल्या जनतेलाच आहे, असे या देशांनी संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे.


व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे पुढचे लक्ष्य ‘ग्रीनलँड’ असल्याचे संकेत दिले होते. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘आम्हाला ग्रीनलँड हवे आहे. कारण तिथे रशियन व चिनी जहाजांचा वावर वाढला आहे. युरोपीय महासंघाचीही इच्छा आहे की, अमेरिकेने ग्रीनलँडचा ताबा घ्यावा.’ ट्रम्प यांनी हे पाऊल अमेरिकेची सुरक्षा व आर्थिक हितासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे युरोपमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


ग्रीनलँड विक्रीसाठी नाही! : युरोपीय देशांनी या निवेदनाद्वारे अमेरिकेला स्पष्ट संकेत दिले आहेत की, ग्रीनलँड ही कोणत्याही प्रकारची ‘मालमत्ता’ किंवा ‘सौद्याची वस्तू’ नाही. तो तिथल्या लोकांच्या हक्काचा प्रदेश आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील लष्करी हस्तक्षेपाचे समर्थन करताना त्याला ‘शांतता मोहीम’ म्हटले होते, मात्र ग्रीनलँडच्या बाबतीत युरोपने घेतलेली ही आक्रमक भूमिका ट्रम्प प्रशासनासाठी मोठी अडचण ठरू शकते.

Comments
Add Comment

बंगालच्या खाडीत धोक्याची घंटा; चीन, पाकिस्तान, बांग्लादेशची भारताविरोधात हालचाल

नवी दिल्ली : सध्याच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे भारताच्या सुरक्षिततेसमोर नवी आव्हाने उभी ठाकली

थायलंडमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यात तुडवलं; ‘सर्व्हिस’घेतली अन् पैसे कमी दिले

सध्या सोशल मिडिया वर एक व्हिडीओ व्हायरल होतआहे.लैंगिक सेवा पुरवल्यानंतर पैशांवरुन झालेल्या वादातून तृतीयपंथी

अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या; एक्स प्रियकराला तामिळनाडूमधून अटक

लास वेगास : अमेरिकेत बेपत्ता झालेल्या २७ वर्षीय भारतीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मेरीलँड

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, एक ताब्यात

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला झाला. ओहायोमध्ये असलेल्या जेडी व्हॅन्स

ट्रम्प यांच्याकडून भारताला करवाढीची पुन्हा धमकी

वॉशिंग्टन : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने आता थेट जपानच्या

बाबा वांगा ची भविष्यवाणी जगावर येणार मोठं संकट व्हेनेझुएलावर हल्ला हा भविष्यवाणीचा इशारा

मुंबई : सध्या जागतिक राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू असून अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव जगाच्या