Iran Israel War : इराक किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या तेल टँकरवर हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू

मुंबई : इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (गुरुवार १२ मार्च) तेरावा दिवस आहे. अशातच आता इराणने रात्री अमेरिकेच्या मालकीच्या सेफसी विष्णू या तेल टँकरवर हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या मालकीच्या ‘SafeSea Vishnu’ या तेलवाहू टँकरवर रात्री उशिरा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला इराणशी संबंधित स्फोटकांनी भरलेल्या बोटीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात जहाजावरील एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


हा टँकर इराकमधील बसरा किनाऱ्याजवळ उभा असताना अचानक जोरदार स्फोट झाला आणि जहाजाला आग लागली. या हल्ल्यानंतर जहाजावरील इतर सुमारे २७ ते ३८ क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.


मृत भारतीय खलाशाची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित देशांच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.







दरम्यान, पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असून समुद्री सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,