धुरंधर पार्ट २ लवकरच होणार रिलीज; अखेर तो दिसणार की नाही?

Dhurandhar 2 Big Entry : धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने तूफान कामगिरी करत केली असून अनेक रेकॉर्डस तोडलेत. ३३ व्या दिवशी चित्रपाटने ४ कोटींचा बिझनेस केला आहे.आणि आता प्रेक्षकवर्ग हा या चित्रपटाच्या पार्ट २ ची वाट पहात आहे. या चित्रपाटाचा पार्ट २ हा १९ मार्चला रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग खूप उत्सुक आहे.रणवीर सिंहच्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १२४० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ७८१ कोटींची कमाई केली आहे.पाचव्या मंगळवारी, चित्रपटाने ४.७५ कोटी कमावले. याच दरम्यान आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.


रणवीर सिंगच्या धुरंधर या चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. पहिल्या भागात शानदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा अक्षय खन्ना मातर या चित्रपटात दिसणार नाहीय पहिल्या भागत रेहमान डकैतचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यत आलं होतं. त्यामुळे त्याची भूमिका तिथेच संपली.पण सिक्वेलमध्ये एक अशी नवीन एन्ट्री आहे जी पाहून तुम्हीही खुश व्हाल. हाच तो माणूस आहे ज्याने अक्षय खन्नाला चमकवले.


या चित्रपटाची कथा आणि कलाकारांव्यतिरिक्त,इंटरनेटवर आता सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या गोष्टी म्हणजे त्यातले संवाद आणि गाणीही."धुरंधर"चित्रपटात अक्षय खन्नाचवर शूट झालेलं "Fa9la" हे गाणं जाम गाजतंय,प्रत्येकाच्या तोंडी त्याची धून आहे. लोकांनी त्यावर अनेक व्हिडीओही बनवले आहे, हे गाणं खूप ट्रेडिंगमध्ये आहे. आता याचा गाण्याच्या क्रिएटरने तगडी हिंट दिली आहे.चित्रपटात अक्षय खन्नावर जे गाणं शूट झालं,ते Fa9la गाणं बहरीन गायक -प्रोड्युसर फ्लिपेराची याने गायलं होतं. त्याचं खरं नाव हुसाम असीम आहे. Fa9la ला जो रिस्पॉन्स मिळाला,त्याने तो खूप आनंदी आहे.आणि हे गाणं "धुरंधर २ " मध्ये परत वाजू शकतं. हे गाणं Fa9la चित्रपटात दिसल्यापासून त्याचं आयुष्य बदलल्याचं त्याने सांगितलं."खरं सांगायचं तर,ते अद्भुत आहे.मला दररोज हजारो मेसेज येतात.हे खूप शानदार आहे "अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.


'धुरंधर'च्या दुसरा पार्ट येण्याची आधीच घोषणा झाली असताना इतर कोणतं गाण पिक्चरमध्ये असेल का असा सवाल फ्लिपेराची याला विचारण्यात आला. तेव्हा त्याने स्पष्ट उत्तर दिलं नाही.पण त्याने ती शक्यता नाकारली देखील नाही. तो म्हणाला - खरंतर काहीही घडू शकतं ना. मी याबद्दल सरप्राईज ठेवणार होतो,पण असं काही घडू शकतं.त्यामुळे धुरंधर पार्ट २ मध्ये फ्लिपराचीचं दुसरं एखादं गाणं येतं का,ते कोणाच्या एंट्रीसाठी वाजेल,अशी उत्सुकता चाहत्यांच्या मनात आहे. या चित्रपटाची लोकं आतुरतेने वाट पहात आहेत.

Comments
Add Comment

सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग

कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर

बिग बॉस सीझन ६ मध्ये 'या' मराठी कलाकाराची एंट्री;ज्याने अल्लू अर्जुनला दिलाय आवा

Shreyas Talpade : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन ६ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत

अभिनेत्री तेजस्विनी लोणारेनी लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर केले 'हे' खास फोटो

समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांच घर हे खूप सुंदर आहे. घरातील भडकपणा टाळून साधेपणा जपण्यात

Katrina Kaif And Vicky Kaushal : "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा किरण..." अखेर समोर आलं ज्युनिअर कौशलचं नाव

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस

Kartik Aaryan: "मिस्ट्री गर्ल करिना म्हणते – मी कार्तिकची गर्लफ्रेंड नाही; फोटो व्हायरल"नक्की काय प्रकरण ?

Kartik Aaryan: बॅालीवुडमधील आपल्या भन्नाट अभिनयामुळे ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन आणि सोनु की टिटु की स्विटी या

रणवीर सिंग भारतीय सिनेमातील एकमेव अभिनेता ठरला, ज्यांनी एका भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट दिला!

नव्या सम्राटाचा उदय: रणवीर सिंगने इतिहास रचला, ‘पुष्पा 2’ ला मागे टाकत ‘धुरंधर’ ठरला बॉलिवूडमधील आतापर्यंतचा